Suraj Chavan: बिग बॉस मराठीचा विजेता सुरज चव्हाण काल, २९ नोव्हेंबर रोजी विवाहबद्ध झाला. संजना गोफणे हिच्यासोबत त्याचा विवाह थाटामाटात पार पडला. गेल्या काही दिवसांपासून लग्नाची चर्चा जोरात होती आणि शेवटी या ग्रँड सोहळ्यात अनेक सेलिब्रिटी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनी उपस्थिती लावली.
सुरज आणि संजनाचे मेहंदी, हळद, संगीत असे सर्व विधी मोठ्या उत्साहात साजरे झाले. लग्नाच्या दिवशी दोघांनीही पारंपारिक लूक निवडला. संजनाने निळ्या रंगाची आकर्षक साडी, सोनेरी शेला, नथ आणि दागिने असा सुंदर लूक केला होता. तर सुरजने पांढऱ्या रंगाची जोधपुरी परिधान केली होती. दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणाऱ्यांना स्पष्ट जाणवत होता.
लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुरजच्या खास मित्रांपैकी जान्हवी किल्लेकर प्रत्येक विधीला सहभागी दिसली. तसेच धनंजय पवार, पुरुषोत्तमदादा पाटील आणि काही राजकीय मान्यवर यांनीही हजेरी लावली.
सुरज चव्हाण आणि संजना गोफणे यांचे लव्ह मॅरेज असून संजना ही सुरजच्या चुलत मामांची मुलगी आहे. नेटकरी या नवदम्पतीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
सुरजने सुरुवातीला टिकटॉक व्हिडिओमधून लोकप्रियता मिळवली. त्यानंतर बिग बॉस मराठीचा विजेता झाल्यावर त्याची लोकप्रियता आणखी वाढली आणि तो महाराष्ट्रात ओळखला जाणारा चेहरा बनला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, वेब सिरीज आणि टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील ताज्या बातम्या, ट्रेंड्स आणि अपडेट्स वाचकांपर्यंत जलदगतीने पोहोचवतो. सत्य माहिती आणि सोप्या भाषेत रिपोर्टिंग करणं ही माझी ओळख आहे.
