Prajakta Mali: लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच तिच्या स्पष्ट बोलण्यामुळे चर्चेत असते. वैयक्तिक आयुष्य, नातेसंबंध किंवा सामाजिक विषय—प्राजक्ता कोणताही मुद्दा लपवून बोलत नाही. तिने अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत स्त्रियांना मिळणारा आदर, त्यांच्या अपेक्षा आणि स्वतःच्या लग्नाविषयी खुलकर मत मांडलं.
‘मुक्काम पोस्ट मनोरंजन’ला दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ता म्हणाली की, पूर्वी घरातील पुरुष स्त्रियांना खूप मानाने वागवत. तिने आपल्या आजोबांचा उल्लेख करत सांगितलं की ते आजीला “अहो” म्हणून बोलायचे, तिच्या तब्येतीची काळजी घ्यायचे, अगदी घरकामही हातात घ्यायचे. हे पाहून स्वतःच्या डोळ्यांसमोर प्रेम आणि सन्मान कसा असतो, हे शिकायला मिळालं, असं ती म्हणाली.
प्राजक्ताच्या मते, बाईला प्रेम आणि आदर मिळाला तर ती नात्यासाठी काहीही करते. पण आजच्या काळात हे कमी होत चालल्याने अनेक स्त्रिया नाराज होतात. “प्रत्येक बाईला माहित असतं की ती किती केपेबल आहे. पण योग्य सन्मानच नसेल, तर ती naturally चिडते,” असं ती म्हणाली.
यानंतर प्राजक्ताने तिच्या लग्नाबद्दलही स्पष्ट सांगितलं. “असं वागणारा मुलगा—ज्याच्याकडून प्रेम आणि respect दोन्ही मिळेल—जर मला भेटला, तर मी त्याच्या प्रेमात पडेन आणि लग्न करेन,” असं ती हसत म्हणाली. पण त्याचवेळी तिने हलक्याफुलक्या शैलीत जोडले, “आता काही मुलं तर खूप माती खाऊन बसतात.”
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, वेब सिरीज आणि टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील ताज्या बातम्या, ट्रेंड्स आणि अपडेट्स वाचकांपर्यंत जलदगतीने पोहोचवतो. सत्य माहिती आणि सोप्या भाषेत रिपोर्टिंग करणं ही माझी ओळख आहे.
