कारभारी लयभारी फेम निखिल चव्हाण आणि अनुष्का सरकटे लग्नबंधनात अडकणार? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Nikhil Chavan and Anushka Sarkate: २०२५ हे वर्ष मराठी कलाविश्वासाठी खास ठरतंय. अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधली, तर काही जण लग्नाच्या तयारीत आहेत. ‘लक्ष्मी निवास’ फेम मेघन जाधव आणि अनुष्का पिंपुटकर यांच्या लग्नाच्या चर्चेनंतर आता आणखी एक लोकप्रिय जोडी चर्चेत आली आहे.

अभिनेता निखिल चव्हाण आणि अभिनेत्री अनुष्का सरकटे लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दोघांनी ‘कारभारी लयभारी’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. ही मालिका २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि दीड वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. या मालिकेदरम्यानच निखिल आणि अनुष्काची मैत्री अधिक घट्ट झाली. त्यानंतर त्यांना अनेक वेळा एकत्र पाहिलं गेलं.

अनुष्काच्या अलीकडील वाढदिवसानिमित्त निखिलने खास पोस्ट शेअर केली होती. त्याने दोघांचा एक फोटो शेअर करत, “हॅपी बर्थडे खतरनाक अनुष्का ❤️” असं कॅप्शन लिहिलं. या पोस्टनंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चांना आणखी चालना मिळाली.

चाहते आता या दोघांच्या लग्नाच्या तारखेची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. मात्र, निखिल किंवा अनुष्काने अद्याप अधिकृतपणे काहीही सांगितलेलं नाही.

निखिल सध्या देवेंद्र पेम यांच्या ‘ऑल द बेस्ट’ या नाटकात तसेच भरत जाधव यांच्यासोबत ‘तू तू मी मी’ या रंगमंचावरच्या प्रयोगात काम करतोय. तर अनुष्का सरकटे ‘तुझीच रे’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात आली होती आणि नंतर ‘३६ गुणी जोडी’मध्ये झळकली.

सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाच्या चर्चांना जोरदार उधाण आलं आहे, आणि प्रेक्षक या दोघांच्या पुढच्या टप्प्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page