Prasad Oak: मराठी चित्रपटसृष्टीतील बहुआयामी अभिनेता प्रसाद ओक याने आपल्या कारकिर्दीतला एक मोठा टप्पा गाठला आहे. त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘वडापाव’ हा त्याच्या शंभराव्या चित्रपटाचा मानकरी ठरला आहे.
“अष्ट रूपा वैभवी लक्ष्मी माता” या पहिल्या चित्रपटापासून सुरू झालेला प्रवास आज 100 चित्रपटांपर्यंत पोहोचला. हा प्रवास खडतर होता, पण प्रत्येक टप्प्याने त्याला नवं शिकवलं आणि प्रेरणा दिली.
फक्त अभिनेता म्हणूनच नव्हे, तर दिग्दर्शक, निर्माता, लेखक, गीतकार अशा विविध रूपांमधून प्रसाद ओकने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नाटक, टेलिव्हिजन आणि चित्रपट या तिन्ही माध्यमांत त्याने ठसा उमटवला आहे.
आपल्या या शतकी प्रवासाबद्दल बोलताना तो म्हणतो, “हा टप्पा माझ्यासाठी रोमांचक आहे. अशोक सराफ, विक्रम गोखले, मोहन जोशी यांसारख्या दिग्गजांसोबत काम करणं ही मोठी शाळा ठरली. मोहन जोशींनी एकदा सांगितलं होतं, की अभिनेता पुन्हा पुन्हा कामासाठी निवडला जातो, तेव्हाच त्याची खरी कसोटी होते. त्यांचे शब्द माझ्यासाठी आजही प्रेरणादायी आहेत.”
गंभीर भूमिका, विनोदी व्यक्तिरेखा, गेस्ट अपीयरन्स किंवा व्हिलन… प्रत्येक वेगळ्या पात्राला त्याने न्याय दिला. त्यामुळेच प्रेक्षकांनी नेहमीच त्याच्यावर विश्वास ठेवला आणि प्रेम दिलं.
प्रसाद ओकचा प्रवास इथे थांबणारा नाही. आगामी काळात नवे आणि रोचक प्रकल्प घेऊन तो लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. शंभर चित्रपटांच्या या प्रवासाचं खरं श्रेय प्रेक्षकांनाच आहे, असं तो मानतो आणि त्यांचे मनापासून आभारही मानतो.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही शो आणि ओटीटीवरील नवीन अपडेट्स, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो. वेगवान, स्पष्ट आणि फॅक्ट-बेस्ड रिपोर्टिंग करणं हे माझं वैशिष्ट्य आहे.
