‘घरत गणपती’ पुन्हा थिएटरमध्ये; गणेशोत्सवात प्रेक्षकांसाठी खास भेट

काही चित्रपट असे असतात की एकदा पाहून भागत नाही. ‘घरत गणपती’ हा त्यापैकीच एक. प्रेक्षकांच्या मागणीनुसार हा लोकप्रिय मराठी चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात दुप्पट आनंद देण्यासाठी 29 ऑगस्टपासून चित्रपटगृहांत हा चित्रपट दाखवला जाणार आहे.

या पुनर्प्रदर्शनाबद्दल दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “प्रेक्षक वारंवार विचारत होते की ‘घरत गणपती’ पुन्हा थिएटरमध्ये कधी पाहायला मिळणार? अखेर गणरायाच्या कृपेने ही इच्छा पूर्ण होत आहे. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याचा अनुभवच वेगळा आहे. एका सुंदर कौटुंबिक कथेतून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा सिनेमा आजही लोकांच्या मनात तितकाच ताजा आहे.”

पॅनोरमा स्टुडिओजचे सीईओ (डिस्ट्रीब्युशन आणि सिंडिकेशन) मुरलीधर छतवानी यांनीही प्रेक्षकांचे आभार मानले. त्यांच्या मते, “संपूर्ण टीमनं अतिशय मेहनत घेऊन हा चित्रपट बनवला आणि प्रेक्षकांनी तो मनापासून स्वीकारला. म्हणूनच तो पुन्हा थिएटरमध्ये आणण्याचा निर्णय घेतला.”

‘घरत गणपती’चा निर्माण पॅनोरमा स्टुडिओज आणि नॅविअन्स स्टुडिओ यांनी केला आहे. दिग्दर्शनाची धुरा नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांनी सांभाळली. निर्मात्यांमध्ये कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत बांदिवडेकर आणि गौरी कालेलकर-चौधरी यांचा समावेश आहे.

चित्रपटात निकिता दत्ता, भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव, संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, सुषमा देशपांडे यांसारख्या अनेक दमदार कलाकारांनी अभिनय केला आहे. संवाद, लेखन, सादरीकरण, गीत-संगीत या प्रत्येक घटकाला प्रेक्षकांकडून प्रचंड दाद मिळाली होती.

आता हीच जादू पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात कुटुंबासोबत नात्यांची उब जपत, ‘घरत गणपती’ पुन्हा थिएटरमध्ये पाहणं ही नक्कीच अविस्मरणीय भेट ठरणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page