Well Done Aai Movie: मराठी प्रेक्षकांसाठी एक नवा चित्रपट लवकरच येतो आहे. नाव आहे ‘वेल डन आई’. आधुनिक काळातील आईची कथा सांगणारा हा चित्रपट ३१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आणि त्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.
टीझरमध्ये एका आईचा ठाम प्लॅन दाखवण्यात आला आहे. तिच्या आत्मविश्वासामुळे मुलामध्येही सकारात्मकता आणि धैर्य येत असल्याचं दाखवलं गेलं आहे. त्याचबरोबर वडिलांचं वेगळं कॅरेक्टर कथानकाला वेगळा रंग देणार आहे, असे संकेत टीझरमधून दिसतात.
या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे विशाखा सुभेदार यांनी. त्यांच्यासोबत विजय निकम, जयवंत वाडकर, आयुष पाटील, सिमरन खेडकर, बीना सिद्धार्थ, तन्वी धुरी आणि विपुल खंडाळे यांच्यासारखे कलाकारही झळकणार आहेत.
‘वेल डन आई’चे लेखन-दिग्दर्शन शंकर अर्चना बापू धुलगुडे यांचे असून, कथा आणि संवाद संदीप गचांडे व शंकर धुलगुडे यांनी लिहिले आहेत. निर्मिती सुधीर पाटील (दीपाली प्रॉडक्शन) यांची असून वितरणाची जबाबदारी सिनेपोलिसकडे आहे.
आईच्या नात्याला आधुनिक दृष्टिकोनातून मांडणारा हा चित्रपट ३१ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
