Usha Nadkarni: ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी अलीकडे एका मुलाखतीत त्यांना झालेला स्वामी समर्थांचा अनुभव सांगितला. मराठी आणि हिंदी मालिकांमधील त्यांच्या दमदार भूमिकांमुळे त्या आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. पण खऱ्या आयुष्यात त्या साध्या स्वभावाच्या असून स्वामी समर्थांवर त्यांची खोल श्रद्धा आहे.
उषा ताई सांगतात, काही वर्षांपूर्वी त्यांच्या बहिणीचा नवरा हॉस्पिटलमध्ये दाखल होता. तेव्हा भाचीने त्यांना काही दिवस घरी राहायला बोलावलं. घरात एक कपाट आवरताना त्यांना स्वामींची छोटी मूर्ती सापडली. “ती तिथे तशीच ठेवलेली बघून वाईट वाटलं,” त्या म्हणाल्या. त्यांनी मूर्ती स्वच्छ धुवून, अष्टगंध लावून देवघरात ठेवली.
याच दिवशी त्या हिंदुजा हॉस्पिटलला जाण्यासाठी रस्ता ओलांडून उबर शोधत उभ्या राहिल्या. एक चालक थांबला आणि कुठे जायचं विचारलं. “मी हिंदुजा सांगितलं. पण त्याने पैसे घेण्यास नकार दिला,” उषा ताईंनी सांगितलं. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर त्यांनी त्याला जबरदस्तीने 100 रुपये दिले. पण मनात मात्र एकच प्रश्न — ‘फुकट का नेलं?’ त्या म्हणतात, “हा योगायोग नव्हता असंच वाटत राहिलं.”
त्या मुलाखतीत त्यांनी अजून एक प्रसंग सांगितला. एफटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी काही शुटिंग सुरू असताना त्या धनकवडीतील मंदिराजवळ होत्या. त्यांनी हेअर ड्रेसरकडून माहिती घेत मंदिरात जाण्याचं ठरवलं. लाईनमध्ये उभ्या असताना त्यांच्या मागे असलेल्या एका बाईने त्यांना अचानक बेल दिला आणि म्हणाली, “घ्या, शंकरावर अर्पण करा.” उषा ताई म्हणाल्या, “माझ्याकडे बेल नाही हे त्या बाईला कसं कळलं? हेही काहीतरी संकेतच वाटला.”
त्यांच्या या अनुभवांवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी ते प्रसंग ऐकून ‘हे योगायोग नसतात’ असंही म्हटलं.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
