पाच दशकांची कारकीर्द आणि अखेर मोठा सन्मान! टॉम क्रूझला ऑस्कर

Tom Cruise: हॉलिवूडचा सुपरस्टार टॉम क्रूझ अखेर ऑस्करचा मानकरी ठरला आहे. जवळपास ४५ वर्षांच्या कारकिर्दीनंतर त्याला पहिला मानद ऑस्कर पुरस्कार मिळाला. अ‍ॅक्शन चित्रपटांमधील त्याच्या दमदार कामगिरीसाठी आणि दीर्घ योगदानासाठी हा विशेष सन्मान जाहीर करण्यात आला.

टॉम क्रूझने १९८० च्या दशकापासून हॉलिवूडमध्ये नाव कमावलं. वयाच्या ६३व्या वर्षी मिळालेला हा पुरस्कार त्याच्यासाठी मोठा क्षण ठरला आहे. यापूर्वी त्याला तीन वेळा ऑस्करसाठी नामांकन मिळालं होतं, पण हातात पुरस्कार आला नव्हता. त्यामुळे चाहत्यांनाही ही बातमी ऐकून खास आनंद झाला आहे.

त्याने १९८१ मध्ये “एंडलेस लव्ह” या चित्रपटातून पदार्पण केलं. पण १९८३ मधील “रिस्की बिझनेस”मुळे त्याला खरी लोकप्रियता मिळाली. पुढे ‘मिशन इम्पॉसिबल’, ‘टॉप गन’, ‘जॅक रीचर’सारख्या मालिकांमध्ये काम करताना त्याची ओळख अ‍ॅक्शन आयकॉन म्हणून झाली. अवघड स्टंट्स स्वतः करून दाखवणं ही त्याची खास ओळख.

टॉम क्रूझनं पाच दशकांमध्ये हिट चित्रपटांसोबत अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही जिंकले. त्याच्या नावावर तीन गोल्डन ग्लोब, तीन स्क्रीन अ‍ॅक्टर्स गिल्ड आणि बाफ्टा पुरस्कार आहे. आता मानद ऑस्कर मिळाल्यानंतर त्याच्या कारकिर्दीत आणखी एक मोठी नोंद झाली आहे. पुढील काळातही तो नवे प्रोजेक्ट्स घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page