दहीहंडीच्या दिवशी रक्तरंजित हादरा! ‘ठरलं तर मग’ मध्ये मधुभाऊंचा खून, सायलीच्या आयुष्याला कलाटणी

Tharla Tar Mag Serial: ‘ठरलं तर मग’च्या 15 ऑगस्ट 2025 च्या भागात प्रेक्षकांना जबर धक्का बसला. सुरुवात होते सायलीने पूर्णा आजीच्या हातातून दूध दूर फेकण्यापासून. घरातील लोकांना तिचं वागणं समजत नाही, पण अर्जुन सांगतो की त्या दुधात विष होतं. त्यानंतर सायली आणि अर्जुन सर्वांसमोर खोट्या कुमूदचा कारनामा उघड करतात. तिने दूधात विष टाकून सर्वांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्ट होतं.

दरम्यान, महिपत, गायत्री, राहुल आणि नागराज एकत्र बसून सुभेदारांच्या घरचं अपयश चर्चा करत असतात. विषप्रयोग फसल्याने गायत्री महिपतवर चिडते. राहुललाही प्लॅन फसण्याची भीती वाटते. याच वेळी सायली आणि अर्जुन खोट्या कुमूदला पकडण्यासाठी नवा प्लॅन आखतात. सायली तिला मुद्दाम सैल बांधते जेणेकरून ती पळून जाईल आणि तिच्या मागे जाऊन खऱ्या शत्रूपर्यंत पोहोचता येईल. खोटी कुमूद पळते आणि महिपत-राहुलला भेटते. पोलिसांच्या भीतीने दोघं पळून जाण्याचा प्रयत्न करतात. महिपत निसटतो, पण राहुलला कला आणि अद्वैत पकडतात आणि पोलिसांच्या हवाली करतात.

याचदरम्यान मधुभाऊ अर्जुन-सायलीला त्यांच्या पालकांबद्दलचा एक महत्त्वाचा खुलासा सांगायला निघतात. पण जाण्याआधी कुसूमला आश्रमातील काही कामांची यादी देतात. ‘जाणं’ ऐवजी ‘जाणार नाही’ असा गूढ इशारा देतात, ज्यामुळे कुसूमला अस्वस्थ वाटतं.

घरात दहीहंडीची तयारी सुरू असते. सायली मुलींच्या संघासोबत हंडी फोडायला थरांवर चढते, अर्जुन तिचं कौतुक करत असतो. पण त्याच वेळी मधुभाऊ सुभेदारांच्या घरात जातात आणि तिथे सायली हीच तन्वी असल्याचा पुरावा त्यांना मिळतो. ते सगळं सत्य सांगण्यासाठी बाहेर पडतात. नागराज त्यांच्या मागे लागलेला असतो. आणि अचानक, तोच मधुभाऊंवर चाकूने हल्ला करतो.

अद्वैतला घरात मधुभाऊ रक्ताच्या थारोळ्यात सापडतात. शेवटच्या क्षणी ते अद्वैतच्या कानात काहीतरी सांगतात आणि प्राण सोडतात. बाहेर अद्वैत अर्जुनला हाका मारतो, पण दहीहंडीच्या गोंगाटात आवाज पोहोचत नाही. शेवटी अर्जुनकडे त्याचं लक्ष जातं आणि अद्वैत सांगतो – “सायलीचे आईबाबा जिवंत आहेत.” अर्जुन हादरतो.

सगळे घरात धावत येतात आणि मधुभाऊंना मृत पाहून शोकाकुल होतात. आनंदाचा सण एका क्षणात दु:खात बदलतो. सायलीच्या डोळ्यांसमोर आयुष्याचं सर्वात मोठं संकट उभं राहतं.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page