मराठी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर नुकतीच कोल्हापूरला जाऊन श्री क्षेत्र महालक्ष्मी देवीचं दर्शन घेऊन आली. या भेटीचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले असून चाहते त्यावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.
देवीसमोर हातात फुलांचा हार घेऊन उभी असलेली स्वानंदी पारंपरिक पोशाखात अतिशय सुंदर दिसत आहे. महालक्ष्मीच्या पाया पडतानाचे फोटोही तिने पोस्ट केले आहेत.
इन्स्टाग्रामवर लिहिलेल्या पोस्टमध्ये ती म्हणते, “आई तुझ्या भेटीला यायचंच होतं… खूप वर्षांनी योग आला.” दर्शन घेताना डोळ्यांतून अश्रू आल्याची कबुलीही तिने दिली.
स्वानंदीचे हे भावनिक क्षण पाहून चाहते भारावून गेले असून अनेकांनी तिच्या पोस्टवर शुभेच्छा आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts

मी मराठी मनोरंजनविश्वातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि ट्रेंडिंग बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो. फॅक्ट-बेस्ड लेखन आणि अपडेटेड माहिती देणं हेच माझं ध्येय आहे.
