स्टार प्रवाहवर प्रेक्षकांना लवकरच एकाच दिवशी दोन ताज्या मालिका पाहायला मिळणार आहेत. 15 सप्टेंबरपासून ‘लपंडाव’ आणि ‘नशिबवान’ या दोन नवीन कथा घराघरात पोहोचतील. प्रोमोनेच प्रेक्षकांचं लक्ष वेधलं असून दोन्ही मालिकांबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
नशिबवान मालिकेत गिरीजा नावाच्या मुलीचं आयुष्य दाखवलं आहे. लहानपणापासून संकटं, जबाबदाऱ्या आणि संघर्ष यांनी वेढलेली गिरीजा आयुष्यात पुढे जाताना स्वत:ला खऱ्या अर्थाने नशिबवान का म्हणते, याचं उत्तर ही मालिका देणार आहे. या कथेत आदिनाथ कोठारे रुद्रप्रतापच्या भूमिकेत दिसणार आहेत. आदिनाथच्या मते, ही त्याची पहिली डेली सोप आहे आणि त्याला या भूमिकेविषयी प्रचंड उत्सुकता आहे.
या मालिकेत नेहा नाईक गिरीजाची भूमिका करत असून हा तिचा पहिलाच टीव्ही शो आहे. तर अनुभवी अभिनेता अजय पूरकर सहा वर्षांनंतर कमबॅक करत खलनायकाच्या भूमिकेत दिसतील. सोनाली खरेदेखील पहिल्यांदाच निगेटिव्ह शेडमध्ये दिसणार असून उर्वशी हे पात्र साकारत आहेत.
लपंडाव मालिकेत रुपाली भोसले, चेतन वडनेरे आणि कृतिका देव यांचं जबरदस्त त्रिकुट आहे. रुपाली ‘तेजस्विनी कामत’ उर्फ सरकारच्या दमदार भूमिकेत परतत आहे. चेतन वडनेरे कान्हा या वेगळ्याच शेड्स असलेल्या भूमिकेत दिसणार आहेत, तर कृतिका देव ‘सखी कामत’ म्हणून प्रेक्षकांसमोर पहिल्यांदाच स्टार प्रवाहवर झळकणार आहे.
रुपाली म्हणाली की, तेजस्विनी ही पैशांना जास्त महत्त्व देणारी आणि सगळ्यांवर आपलं राज्य गाजवणारी व्यक्तिरेखा आहे. चेतनसाठी कान्हा ही पूर्णपणे वेगळी आणि आव्हानात्मक भूमिका ठरणार आहे. कृतिकाने सांगितलं की, श्रीमंती असूनही आईच्या प्रेमासाठी आसुसलेली मुलगी साकारणं तिच्यासाठी वेगळं अनुभव देणार आहे.
15 सप्टेंबरपासून ‘लपंडाव’ दुपारी 2 वाजता आणि ‘नशिबवान’ रात्री 9 वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, वेब सिरीज आणि टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील ताज्या बातम्या, ट्रेंड्स आणि अपडेट्स वाचकांपर्यंत जलदगतीने पोहोचवतो. सत्य माहिती आणि सोप्या भाषेत रिपोर्टिंग करणं ही माझी ओळख आहे.
