Pooja Birari: छोट्या आणि मोठ्या पडद्यावर ओळख निर्माण केलेले अभिनेता सोहम बांदेकर आणि ‘वेड लागलं प्रेमाचं’ फेम अभिनेत्री पूजा बिरारी नुकतेच विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर त्यांच्या फोटो आणि व्हिडिओंनी सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. आता मात्र या जोडप्याबाबत एक नवी चर्चा सुरू झाली आहे.
लग्नानंतर सोहम आणि पूजा सासू-सासऱ्यांसोबत न राहता वेगळं घर घेत असल्याचं समोर आलं आहे. दोघांनीही नव्या घराच्या चावीसोबतचा फोटो शेअर केला असून, चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र या फोटोमुळे ‘लग्नानंतर लगेच वेगळा संसार?’ असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला.
या चर्चेमागचं कारण म्हणजे सुचित्रा बांदेकर. सोहमच्या लग्नाआधी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आपल्या विचारांबद्दल स्पष्ट भूमिका मांडली होती. त्यांच्या मते, लग्नानंतर मुलांनी वेगळं राहावं आणि स्वतःचा संसार उभा करावा.
त्या म्हणाल्या होत्या की, “आदेशच्या आईचाही हाच विचार होता. लग्न झाल्यावर मुलांनी आपला संसार वेगळा करावा. काही गरज पडली तर आई-वडील आहेतच. मी सोहमलाही सांगितलंय की लग्नानंतर वेगळं घर घ्या आणि तुमचं आयुष्य आनंदात जगा.”
याच विधानामुळे आता सोहम आणि पूजा खरंच वेगळा संसार थाटत आहेत का, यावर चर्चा होत आहे. सध्या मात्र लग्नानंतर दोघेही पुन्हा आपल्या-आपल्या कामात व्यस्त झाले असून, नव्या आयुष्याची सुरुवात करताना ते आनंदी दिसत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
