Smriti Mandhana: भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबत मोठी चर्चा सुरू आहे. 23 नोव्हेंबरला त्यांचा लग्नसोहळा होणार होता, पण अचानक स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. या परिस्थितीत दोन्ही कुटुंबांनी लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती कार्यक्रमाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या मॅनेजरने दिली.
लग्न पुढे सरकल्यानंतर स्मृतीने सोशल मीडियावरून साखरपुडा आणि लग्नाशी संबंधित फोटो-व्हिडीओ हटवले. हा निर्णय पाहताच चाहत्यांमध्ये विविध चर्चा सुरू झाल्या. लग्न पुढे ढकलणे वेगळी गोष्ट, पण पोस्ट डिलिट करण्यामागचं नेमकं कारण काय, याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
या सर्वांवर पलाशची बहीण आणि प्रसिद्ध गायिका पलक मुच्छल पुढे आली आहे. तिने सोमवारी रात्री एक पोस्ट करत परिस्थिती स्पष्ट केली. पलक म्हणाली की, स्मृतीच्या वडिलांची प्रकृती नाजूक असल्याने लग्न पुढे ढकलण्यात आलं आहे. तिने सर्वांना दोन्ही कुटुंबांच्या खासगीपणाचा आदर करण्याची विनंतीही केली.
दरम्यान, स्मृती आणि पलाशचं लग्न आता कधी होणार, याबद्दल अधिकृत माहिती उपलब्ध नाही. काही दिवसांपूर्वी पलाशने डीवाय पाटील स्टेडियममध्ये स्मृतीला प्रपोज केलं होतं आणि त्या क्षणाचा व्हिडीओही शेअर केला होता. यानंतर त्यांच्या ग्रँड वेडिंगची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. पण खासगी कारणांमुळे समारंभ सध्या पुढे ढकलण्यात आला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
