Shiv Thakare: बिग बॉस मराठीचा विजेता शिव ठाकरे दोन दिवसांपूर्वी मोठ्या अडचणीत सापडला. मुंबईतील त्याच्या घराला अचानक आग लागली आणि काही मिनिटांतच लिव्हिंग रूम पूर्ण जळून गेली. अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत आग विझवली, पण घराचं मोठं नुकसान झालं.
आगीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. शिवनं हे घर फक्त दोन वर्षांपूर्वी घेतलं होतं. त्यामुळे ही घटना चाहत्यांसाठीही धक्कादायक होती. नंतर त्यानं शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचं सांगत स्टोरी शेअर केली.
व्हायरल भयानीला दिलेल्या मुलाखतीत शिवनं त्या रात्रीचा अनुभव सांगितला. तो म्हणाला, “मी घरातच होतो आणि झोपलो होतो. काहीच आवाज नव्हता, सायरनही नाही. अख्खं घर जळत होतं आणि मला काहीच कळलं नाही. देवाच्या कृपेनं वाचलो. आमची काम करणारी बाई देवदूत बनून आली. तिनं दार ठोठावलं आणि तेव्हा मला समजलं.”
तो पुढे म्हणाला की, नुकसान मोठं असलं तरी ते पुन्हा कमावता येईल. पण काही गोष्टी लोकांच्या मनाला जास्त लागतात. “सगळ्यात जास्त ट्रॉफी जळाल्या याचं वाईट वाटलं. ते मेहनतीनं मिळवलेलं सन्मान असतं. बाकी पैसे कमावता येतात, पण ती शाबासकी जळताना पाहणं खूप दुखतं,” असं शिवनं सांगितलं.
शिवने सांगितलेली ही घटना चाहत्यांना भावली असून, सोशल मीडियावर त्याच्यासाठी प्रचंड सपोर्ट दिसतोय.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.