Shah Rukh Khan Marksheet: बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख खान आज जगभरात ओळखला जातो. अभिनय, लोकप्रियता आणि संपत्ती—सगळ्यांत तो अव्वल. पण एक काळ असा होता जेव्हा शाहरुख इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. सध्या सोशल मीडियावर त्याची जुनी मार्कशीट व्हायरल झाली आहे आणि चाहत्यांना त्याच्या तरुणपणाच्या आठवणींमध्ये डोकावण्याची संधी मिळाली आहे.
हा फोटो दिल्लीतील हंसराज कॉलेजचा आहे. इथे शाहरुखने 1985 ते 1988 दरम्यान अर्थशास्त्रात पदवी पूर्ण केली. गुणपत्रिकेनुसार, काही विषयांमध्ये त्याने उत्कृष्ट गुण मिळवले. गणित आणि भौतिकशास्त्रात त्याचे 78 गुण आले, तर काही विषयांत 92 पर्यंत गुण मिळाले. मात्र इंग्रजीमध्ये त्याला केवळ 51 गुण मिळाले आणि त्यावरून सोशल मीडियावर मजेशीर प्रतिक्रिया उमटल्या.
रोमान्सचा राजा म्हणून ओळखला जाणारा शाहरुख अभ्यासातही वाईट नव्हता, पण इंग्रजीत त्याची थोडी घसरगुंडी झाली असं दिसतं. मार्कशीट पाहिल्यानंतर अनेकांनी त्याचं कौतुक केलं आणि कमी गुण असूनही जिद्द व मेहनतीने मोठं यश मिळवल्याचं उदाहरण म्हणून त्याचं नाव घेतलं.
पदवी पूर्ण झाल्यावर शाहरुखने जामिया मिलिया इस्लामिया येथे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. पण नशिबाने त्याला अभिनयक्षेत्रात आणलं. टेलिव्हिजनपासून सुरुवात करत तो अखेर भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा स्टार बनला. त्याचा संघर्ष आणि यशाचा प्रवास आजही अनेकांसाठी प्रेरणा आहे.
शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो लवकरच ‘King’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच शाहरुख आणि सुहाना खान एकत्र स्क्रीन शेअर करणार असून चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही शो आणि ओटीटीवरील नवीन अपडेट्स, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो. वेगवान, स्पष्ट आणि फॅक्ट-बेस्ड रिपोर्टिंग करणं हे माझं वैशिष्ट्य आहे.
