Ranveer Singh: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या ‘धुरंधर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान केलेल्या एका वक्तव्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला. ‘कांतारा: चॅप्टर १’ या चित्रपटातील एका दृश्यावर भाष्य करताना त्याने देवीचा उल्लेख ‘स्त्री भूत’ असा केला. यामुळे त्याच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप झाला.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव IFFI मध्ये रणवीरने ऋषभ शेट्टीच्या अभिनयाचं कौतुक करत तो सीन विनोदी शैलीत मांडला. पण त्यातील देवीला भूत म्हणल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावरही त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.
वाढत्या वादानंतर रणवीरने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत स्पष्टीकरण दिलं. त्याने लिहिलं, “माझा उद्देश फक्त ऋषभच्या अप्रतिम अभिनयाचं कौतुक करणं होता. मला त्या दृश्याचं महत्व समजतं. मी भारतीय संस्कृती आणि श्रद्धांचा नेहमीच आदर करतो. कोणाचं मन दुखावलं असेल तर मी मनापासून माफी मागतो.”
दरम्यान, हिंदू जनजागृती समितीने रणवीरविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. चामुंडा देवीला ‘भूत’ म्हणणं हा अपमान असून त्यावर कारवाई करावी, अशी मागणी समितीने केली.
आता रणवीरची ही सार्वजनिक माफी वाद शांत करण्यास कितपत मदत करते, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
