Rakhi Sawant Evicted from Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस मराठी ६’मध्ये पुन्हा एकदा मोठा वाद समोर आला आहे. यावेळी चर्चेत आहे राखी सावंत. शोमध्ये वाइल्डकार्ड एन्ट्री घेतल्यानंतर ती सतत चर्चेत होती. आता मात्र तिच्या घराबाहेर जाण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये घरातील वातावरण तणावपूर्ण दिसत आहे. राखी सावंतच्या वागण्यावर बिग बॉस नाराज असल्याचं दाखवलं आहे. घरात गोंधळ घालणे आणि वस्तू इकडे-तिकडे फेकणे, असे प्रकार दाखवण्यात आले आहेत. काही दृश्यांमध्ये ती बेडवर कचरा टाकताना दिसते.
या प्रकारानंतर बिग बॉसने तिला कन्फेशन रूममध्ये बोलावलं. तिथे तिच्यावर कारवाई होणार असल्याचं सांगितलं जातं. होस्ट रितेश देशमुख यांनीही कठोर निर्णयाची मागणी केल्याचं प्रोमोमध्ये ऐकू येतं.
राखीने यावेळी माफी मागितल्याचंही दिसतं. मात्र, बिग बॉसचं मन विरघळलं नाही, अशी चर्चा आहे. प्रोमोमध्ये बाऊन्सर्स तिला बाहेर नेत असल्याचे दृश्य दाखवले आहेत. त्यामुळे ती खरंच घराबाहेर पडली का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
राखी सावंत वाइल्डकार्ड स्पर्धक म्हणून घरात आली होती. तिच्या एन्ट्रीमुळे ‘Bigg Boss Marathi 6’ चा टीआरपी वाढेल, अशी अपेक्षा होती. पण सुरुवातीपासूनच तिचं वागणं वादग्रस्त ठरलं.
प्रोमोमध्ये राखी तिची बाजू मांडताना दिसते. “मी काय चूक केली?” असा सवाल ती करते. तसेच तिला घराबाहेर काढू नये, अशी विनंतीही करते. पण शेवटी बाऊन्सर्सनी बाहेर नेल्याचं दृश्य दाखवण्यात आलं आहे.
हा सगळा प्रकार नेमका काय आहे, आणि राखी सावंतचा प्रवास इथेच थांबतो का, हे येणाऱ्या भागात स्पष्ट होणार आहे. सध्या मात्र Bigg Boss Marathi 6 मध्ये पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
