Rakhi Sawant: राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवस सोशल मीडियापासून दूर राहिल्यानंतर तिचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आणि त्यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. या व्हिडिओमध्ये राखीने धर्मेंद्र यांच्या तब्येतीवर विनोद केल्याचं दिसलं, ज्यामुळे अनेकांना तिचं वागणं पटलं नाही.
राखी नेहमीच तिच्या वेगळ्या बोलण्यामुळे चर्चेत असते. तिचा विनोदी अंदाज अनेकांना आवडतो, पण यावेळी तिचं विधान लोकांना खटकलं. व्हिडिओ समोर आल्यानंतर तिच्यावर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली.
धर्मेंद्रबद्दल बोलताना राखी म्हणाली की ती त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करते. “ते आजारी पडल्याच्या दुसऱ्या दिवशी ते माझ्या स्वप्नात आले,” असं ती म्हणाली. “राखी, रडू नकोस,” त्यांनी मला सांगितलं, असा दावा राखीने केला. पुढे ती म्हणाली की, “मी त्यांना सांगितलं की संपूर्ण देश तुम्हाला miss करत आहे.”
राखीने आणखी एक दावा केला की, “बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर त्यांनी ‘शोले’च्या गाण्यावर डान्स केला आणि माझ्या स्वप्नात म्हणाले की तू हेमा मालिनीपेक्षा छान डान्स केला.” या विधानानंतर सोशल मीडियावर नेटकरी अक्षरशः भडकले.
व्हिडिओच्या कमेंट्समध्ये अनेकांनी राखीवर टीका केली. एका नेटकऱ्याने लिहिलं, “राखी, कधी तरी खरं बोल.” तर दुसऱ्याने चेष्टेत विचारलं, “हिला सनी देओल ची भीती नाही का वाटत?”
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
