Pranit More: Bigg Boss 19 आता अंतिम टप्प्याकडे जात आहे आणि सध्या फॅमिली वीकची रंगत चांगलीच वाढली आहे. स्पर्धकांच्या कुटुंबीयांना घरात भेट देण्याची संधी मिळत आहे. अभिनेत्री अशनूर कौरचे वडील गुरमीत सिंगही लेकीला भेटायला आले. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहेत.
याच दरम्यान, गुरमीत आणि मराठमोळा कॉमेडियन Pranit More यांचा एक व्हिडिओ विशेष चर्चेत आला. अशनूरशी भेट झाल्यानंतर गुरमीत यांनी घरातील इतर सदस्यांनाही भेट दिली. अमाल मलिक आणि गौरव खन्नाने त्यांना गळाभेट दिली. पण प्रणित त्यांच्या जवळ आला, तेव्हा त्याने सर्वात आधी पायस्पर्श केला आणि मग आलिंगन दिलं. गुरमीत यांनीही हसतच त्याला “खूप बारीक झाला आहेस” असं सांगितलं.
हा क्षण सोशल मीडियावर येताच नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला. “मोठं होणं सोपं, संस्कार टिकवणं कठीण” असं एका व्हिडिओला कॅप्शन दिलं गेलं. अनेकांनी प्रणितच्या वागणुकीचं कौतुक करत, “शेवटी मराठी माणूस आहे”, “ही खरी मराठी संस्कृती” अशा कमेंट्स केल्या. काही चाहत्यांनी तर तो या पर्वाचा विजेता होऊ शकतो अशीही अपेक्षा व्यक्त केली.
फॅमिली वीकमध्ये अशनूरच्या वडिलांसोबतच अभिनेत्री कुनिका सदानंद यांचा मुलगा अयान लालही घरात आला. येणाऱ्या भागांत गौरवची पत्नी, प्रणितचा भाऊ, फरहाना भट्टची आई अशा अनेकांची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे हा आठवडा स्पर्धकांसाठी भावनिक आणि महत्त्वाचा ठरणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
