Marathi Celebrities: २०२५ हे वर्ष मराठी मनोरंजनसृष्टीसाठी सोपं ठरलं नाही. वर्षाच्या सुरुवातीलाच काही लोकप्रिय कलाकारांनी काडीमोडाचा निर्णय घेतला. प्रेक्षक मराठी कलाकारांकडे आदर्श जोडपं म्हणून पाहतात, त्यामुळे अशा बातम्या समोर आल्या की धक्का बसणं स्वाभाविक आहे. अनेकांनी सोशल मीडियावरून फोटो हटवले, एकमेकांना अनफॉलो केलं आणि नात्याचा शेवट स्वीकारला.
‘जीव माझा गुंतला’ मालिकेमधून ओळख मिळालेली योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांचा विवाह ३ मार्च २०२४ रोजी झाला होता. लग्नानंतर काही महिन्यांतच दोघांनी सर्व फोटो डिलिट केले. तसेच एकमेकांना अनफॉलो केल्याने त्यांच्या नात्यात काहीतरी बिनसल्याची चर्चा सुरू झाली. घटस्फोटाबद्दल त्यांनी अजून काही बोललेलं नाही.
प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे आणि नेहा देशपांडे यांनी १७ वर्षांच्या सहजीवनानंतर मार्ग वेगळे केले. राहुल यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत याबद्दल माहिती दिली. दोघांनी परस्पर सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्यात आदर आणि मैत्री कायम राहणार आहे. मुलगी रेनुकाचा सांभाळ ते दोघे मिळून करत आहेत.
अक्षया गुरव आणि भूषण वाणी या जोडप्याने २३ मे २०१७ ला लग्न केलं. पण ऑक्टोबर २०२५ मध्ये त्यांनी एकमेकांना अनफॉलो केलं आणि लग्नाचे फोटो काढून टाकले. आठ वर्षांनी त्यांच्या नात्यात अंतर आलं. घटस्फोटाचं कारण मात्र स्पष्ट झालेलं नाही.
शुभांगी सदावर्ते आणि संगीतकार आनंद ओक यांनी २०२० मध्ये लग्न केलं होतं. पाच वर्षांनी, सप्टेंबर २०२५ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. विशेष म्हणजे, तीन महिन्यांनंतर शुभांगीने पुन्हा संसार थाटला. ती आता ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचे निर्माता सुमित म्हशीलकर यांच्याशी विवाहबद्ध झाली आहे.
२०२५ मध्ये मराठी इंडस्ट्रीत अनेक नाती संपली. पण कलाकारांनी आपल्या आयुष्याला नवीन सुरुवात देण्याचा निर्णय घेतला, हेही तितकंच महत्त्वाचं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
