Last Stop Khanda Movie: प्रेमाच्या प्रवासावर आधारित खास कथा घेऊन येतोय मराठी चित्रपट ‘लास्ट स्टॉप खांदा’. आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला प्रेमाच्या स्टॉपवर थांबावसं वाटतं, काही भेटतात, काही फक्त रमतात, आणि काही आठवणी मनात कायम राहतात. अशीच प्रत्येकाच्या प्रेमाची कहाणी या संगीतमय चित्रपटात साकारली गेली आहे. चित्रपट २१ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, नुकतंच त्याचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.
चित्रपटाची स्टारकास्टही तगडी आहे. अभिनेता श्रमेश बेटकर मुख्य भूमिकेत आहे. त्यासोबत जुईली टेमकर, निखिल बने, मंदार मांडवकर, शशिकांत केरकर, सुदेश जाधव, महेश करपेकर, प्रियांका हांडे, डॉ. सचिन वामनराव, गणेश गुरव, निशांत जाधव, गिरीश तेंडुलकर, जयश्री गोविंद यांसारखे कलाकार दिसणार आहेत. पाहुणे कलाकार म्हणून प्रभाकर मोरे, धनश्री काडगावकर, अशोक ढगे उपस्थित राहणार आहेत.
चित्रपटाचे छायांकन हरेश सावंत यांनी केले असून, कलादिग्दर्शनाची जबाबदारी केशव ठाकुर यांच्या हाती आहे. गीतसंग्रह श्रेयस राज आंगणे आणि किशोर मोहिते यांनी केला आहे, तर गीतांची लेखनकृती श्रमेश बेटकर यांनी साकारली आहे.
प्रेमाच्या नात्याची वेगळी कहाणी, नव्या दमाचे कलाकार आणि आकर्षक संगीत या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक प्रेक्षकाला स्वतःशी रिलेट करता येईल अशी ही कथा सादर करण्यात आली आहे. तांत्रिकदृष्ट्या मजबूत आणि संपूर्ण कुटुंबासाठी मनोरंजन करणारा हा चित्रपट प्रेक्षकांना वेगळा अनुभव देणार आहे.
निर्मिती शिवम फिल्म क्रिएशन, सिग्नेचर ट्यून्स, स्नेहा प्रॉडक्शन्स यांनी केली असून, प्रस्तुतकर्ते सचिन कदम आणि सचिन जाधव आहेत. निर्मिती प्रदीप मनोहर जाधव, सहनिर्माते सचिन कदम आणि अमृता सचिन जाधव, तर दिग्दर्शन विनीत परुळेकर यांनी केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
