Komal Kumbhar: मराठी मनोरंजनविश्वात आणखी एक सुंदर जोडी लग्नबंधनात अडकली आहे. कोमल कुंभार आणि गोकुळ दशवंत यांनी काही दिवसांपूर्वी लग्न केलं. स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका सहकुटूंब सहपरिवारमधून कोमलला चांगली ओळख मिळाली. अंजीच्या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली.
गोकुळ आणि कोमल यांची ओळख अनेक वर्षांची. दोघेही बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये असून दोन वर्षांपूर्वीच गोकुळने तिच्या वाढदिवशी तिला प्रपोज केलं होतं. सोशल मीडियावर तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. गोकुळ हा मराठी इंडस्ट्रीत अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून काम करतो.
लग्नसोहळ्यात कोमलने पोपटी रंगाची नऊवारी परिधान केली होती. हातात हिरवा चुडा, आणि पारंपरिक नथ तिच्या लूकला सुंदर उठाव देत होती. गोकुळने ऑफ-व्हाईट शेरवानी आणि कोमलच्या साडीला साजेशी फेटा बांधला होता.
कोमलने ‘सहकुटुंब सहपरिवार’नंतर ‘अबोली’ मालिकेतही काम केलं आहे. लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
