Katrina Kaif and Vicky Kaushal Welcome Baby Boy: बॉलिवूडचं लोकप्रिय जोडपं कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांच्या घरी गोड बातमी आली आहे. वयाच्या ४२व्या वर्षी कतरिनानं मुलाला जन्म दिला आहे. विक्की कौशलनं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ही आनंदाची बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली.
“आमच्या आनंदाचं आगमन झालंय. अपार प्रेम आणि कृतज्ञतेनं आम्ही आमच्या मुलाचं स्वागत करतोय,” असं विक्कीनं पोस्टमध्ये लिहिलं आहे. पोस्टमध्ये बाळाचा जन्मदिन ७ नोव्हेंबर २०२५ असा नमूद केला आहे.
या गोड बातमीनंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. विक्की-कतरिनाच्या फोटोंवर चाहते आणि सहकलाकार दोघांनीही हार्ट आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. मनीष पॉल, रकुल प्रीत सिंह, अर्जुन कपूर आणि हुमा कुरेशी यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.
कतरिना कैफच्या प्रेग्नंसीच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु होत्या. काही दिवसांपूर्वी तिनं बेबी बंपसह विक्कीसोबतचा फोटो शेअर करून चाहत्यांना खूश केलं होतं. सप्टेंबर महिन्यात या जोडप्यानं आपल्या पहिल्या अपत्याच्या आगमनाची घोषणा केली होती.
सध्या चाहत्यांना त्यांच्या बाळाची पहिली झलक पाहण्याची उत्सुकता लागली आहे. विक्की कौशल आणि कतरिना कैफसाठी हा क्षण त्यांच्या आयुष्यातील सर्वात खास टप्पा ठरला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
