Kamali Serial Zee Marathi: मराठी टेलिव्हिजनसाठी अभिमानाचा क्षण घडला आहे. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’चा कबड्डी विशेष प्रोमो थेट अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकला आहे. अशा प्रकारे टाईम्स स्क्वेअरवर झळकणारी ‘कमळी’ ही पहिली मराठी मालिका ठरली असून, महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ कबड्डी आणि मराठी संस्कृतीचा जागतिक स्तरावर गौरव झाला आहे.
कबड्डी हा खेळ ताकद, चातुर्य आणि संघभावना याचं प्रतीक मानला जातो. या विशेष भागात टीम कमळी (विजया बाबर) आणि टीम अनिका (केतकी कुलकर्णी) यांच्यातील थरारक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
या यशाबद्दल भावना व्यक्त करताना अभिनेत्री विजया बाबर म्हणाली, “कमळी ही माझ्यासाठी फक्त भूमिका नाही, तर प्रेरणादायी प्रवास आहे. एका गावाकडच्या मुलीची स्वप्नं, तिचा संघर्ष आणि जिद्द जगभर पोहोचते आहे. टाईम्स स्क्वेअरवर आमचा प्रोमो झळकणं हे माझ्या स्वप्नातही नव्हतं. ही केवळ माझी गोष्ट नाही, तर हजारो मराठी मुलींचं प्रतिनिधित्व आहे.”
‘कमळी’च्या या उपक्रमामुळे मराठी टेलिव्हिजन, परंपरा आणि खेळाचा जागतिक स्तरावर सन्मान झाला आहे. खरं तर ही मोहीम म्हणजे संस्कृती, परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम ठरली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
