Gayatri Datar: मराठी सिनेविश्वात सध्या लग्न आणि साखरपुड्याच्या बातम्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. गायत्री दातार हिनं चाहत्यांसोबत एक खास गोष्ट शेअर केली आहे.
गायत्रीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपण प्रेमात पडल्याची कबुली दिली आहे. या पोस्टमध्ये तिनं तिच्या पार्टनरसोबतचा फोटो शेअर केला असला, तरी त्याची ओळख मात्र गुपितच ठेवली आहे. फोटोसोबत ‘माझ्या आयुष्यात हिरोची एन्ट्री झाली आहे’ असं कॅप्शन तिनं लिहिलं आहे.
या पोस्टमध्ये गायत्रीनं असंही म्हटलं आहे की, आयुष्यातील काही अविस्मरणीय क्षण चाहत्यांसोबत शेअर करताना तिला खूप आनंद होत आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
गायत्रीच्या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. यासोबतच अनेक मराठी कलाकारांनीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत. मिताली मयेकर, धनश्री काडगावकर यांसारख्या कलाकारांनी कमेंट करत आनंद व्यक्त केला आहे.
दरम्यान, गायत्रीच्या आयुष्यातला तो खास व्यक्ती नेमका कोण, याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. तो कोण आहे? याचं उत्तर गायत्री कधी देणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
गायत्री दातार झी मराठीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेमधून घराघरात पोहोचली. या मालिकेमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ती बिग बॉस मराठीमध्येही स्पर्धक म्हणून दिसली होती. अलीकडेच ती कलर्स मराठीवरील ‘अबीर गुलाल’ या मालिकेत झळकली होती.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
