Gautami Patil: लावणी क्वीन म्हणून ओळखली जाणारी गौतमी पाटील आता नवीन गाण्यामुळे चर्चेत आली आहे. नुकतंच तिचं “राणी एक नंबर” हे गाणं रिलीज झालं असून, प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतोय.
या गाण्याला गायिका सोनाली सोनवणे हिने आवाज दिला आहे. शब्दलेखन रोहन साखरे यांचं असून, संगीत मोहन उपासनी यांनी दिलं आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी कैलाश पवार यांनी सांभाळली आहे. बॉलिवूड स्टाईल टच असलेलं हे डान्सिकल गाणं सध्या सोशल मीडियावर जोरदार ट्रेंडिंग होत आहे.
गौतमी पाटील म्हणाली, “गाण्याच्या नावातच ‘राणी एक नंबर’ आहे, म्हणजे गाणंही नक्की एक नंबरच होणार. शूटिंग करताना खूप मजा आली. माझ्या चाहत्यांना विनंती आहे की, या गाण्यावर सुंदर रील व्हिडिओ बनवा आणि मला टॅग करा.”
गायिका सोनाली सोनवणेने रेकॉर्डिंगबद्दल सांगितलं की, “हे गाणं फीमेल सेंट्रिक आहे. एक आत्मविश्वासू मुलगी काय बोलेल, तशाच हरकती मी गाण्यात घेतल्या. स्टुडिओमध्ये सगळ्यांनी मला प्रोत्साहन दिलं आणि मी पूर्ण एनर्जीने गायलं.”
संगीतकार मोहन उपासनी यांनीही आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “एक नंबर हा शब्द मनात घोळत होता आणि त्यावरच ही कॉम्पोझिशन केली. गाण्याला मिळालेला प्रतिसाद अप्रतिम आहे. पिवोट म्युझिक नेहमीच प्रेक्षकांसाठी असं वेगळं आणि दर्जेदार संगीत आणत राहील.”
सध्या “राणी एक नंबर” इंस्टाग्रामवर ट्रेंडिंग आहे आणि चाहते मोठ्या प्रमाणावर रील्स बनवून शेअर करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
