बिग बॉस मराठीत गौतमी पाटील दिसणार नाही? अभिनेत्रीचं थेट वक्तव्य

Gautami Patil in Bigg Boss Marathi 6: महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आपल्या नृत्याने वेड लावणारी गौतमी पाटील सध्या सतत चर्चेत आहे. लाईव्ह शो, म्युझिक अल्बम, आयटम नंबर आणि रिअॅलिटी शोमधून ती प्रेक्षकांसमोर येत आहे. त्यामुळेच गौतमी बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात सहभागी होणार, अशा चर्चा रंगल्या होत्या.

मात्र आता या चर्चांवर स्वतः गौतमीनेच स्पष्ट भूमिका मांडली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने बिग बॉस मराठीबाबत मोठा खुलासा केला. गौतमीने सांगितलं की, तिला याआधीही बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनसाठी ऑफर आली होती. पण तिने ती नाकारली होती.

यामागचं कारण सांगताना गौतमी म्हणाली की, ती तीन-चार दिवसांपेक्षा जास्त काळ आईपासून दूर राहू शकत नाही. आईशिवाय राहणं आपल्याला जमत नाही आणि आई हेच आपलं पहिलं प्राधान्य असल्याचं तिने ठामपणे सांगितलं. त्यामुळेच तिने पुन्हा एकदा बिग बॉसला नकार दिला आहे.

बिग बॉसच्या घरात जाणार नसली तरी, गौतमीने या शोचं कौतुक केलं आहे. बिग बॉस हा मोठा रिअॅलिटी शो असून कलाकारांना मोठी ओळख आणि प्रसिद्धी मिळते, असं तिचं मत आहे. करिअरसाठी हा शो महत्त्वाचा असतो, पण वैयक्तिक कारणांमुळे आपण तो स्वीकारू शकत नसल्याचं तिने स्पष्ट केलं.

दरम्यान, कामाच्या बाबतीत गौतमी सध्या व्यस्त आहे. बिग बॉस मराठी 5 चा उपविजेता अभिजीत सावंत याच्यासोबतचं ‘रुपेरी वाळूत’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. याशिवाय ती लवकरच काही मराठी चित्रपट आणि नव्या गाण्यांच्या अल्बममध्येही दिसणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page