डीजेच्या गोंगाटात पारंपरिक वादन दडपलं! गणेश विसर्जनात सौरभ गोखलेचा कटू अनुभव

Saurabh Gokhale: गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा गोंगाट आता सर्वत्र ऐकायला मिळतो. पुणे आणि मुंबईत अजूनही अनेक गणपतींचं विसर्जन सुरू आहे. पण डीजेच्या कर्णकर्कश्य आवाजामुळे पारंपरिक वाद्य वाजवणाऱ्या कलावंतांना आपली कला सादर करणे अशक्य होतंय. अभिनेता सौरभ गोखले यालाही याचाच त्रासदायक अनुभव आला.

सौरभने सांगितलं, “मी कलावंत पथकासोबत मार्केट यार्ड गणेश मंडळाच्या मिरवणुकीत सहभागी होतो. संध्याकाळी सहा वाजता वादन सुरू करायचं ठरलं होतं. पण टिळक रोडवर डीजेचा प्रचंड गोंगाट आणि न हलणारी मिरवणूक यामुळे आमची वाट अडली. मंडळाने खूप प्रयत्न केले, तरी काहीच उपयोग झाला नाही. लोकं डीजेच्या आवाजात रममाण झाली होती आणि शेवटी आम्हाला वादन न करण्याचा निर्णय घ्यावा लागला.”

या अनुभवाबद्दल कलाट्रस्ट पथकाने इंस्टाग्रामवर एक पोस्टही शेअर केली आहे. त्यांनी लिहिलं की, “संध्याकाळी सहा वाजता आम्ही वादनासाठी पूर्ण तयार होतो. पण मिरवणूक पुढे सरकलीच नाही. रात्री नऊ वाजता एक गजर करून, ध्वजवंदन करत वादन थांबवावं लागलं. आम्हाला उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांची निराशा झाली याचं दुःख आहे. आता पुढच्या उत्सवात भेटू.”

गणेशोत्सवात पारंपरिक वादनाचं महत्त्व नेहमीच वेगळं राहिलं आहे. पण डीजेच्या प्रचंड आवाजामुळे अशी कला बाजूला पडत असल्याचं चित्र सौरभ गोखलेच्या अनुभवातून स्पष्ट झालं.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page