ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा दशावतार हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर झपाट्याने धावत आहे. 12 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला हा मराठी सस्पेन्स थ्रिलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. कथानक आणि दमदार स्टारकास्टमुळे सिनेमाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, प्रभावळकरांच्या अभिनयाने प्रेक्षक थक्क झाले आहेत.
चौथ्या दिवशी चित्रपटाने 1.01 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे चार दिवसांचे एकूण कलेक्शन आता 5.7 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. पहिल्या दिवशी 58 लाख, दुसऱ्या दिवशी 1.39 कोटी, तर रविवारी तब्बल 2.72 कोटींची कमाई झाली होती.
या यशामुळे दशावतारने ‘गुलकंद’सह काही बॉलिवूड चित्रपटांनाही मागे टाकलं आहे. ‘गुलकंद’ने चार दिवसांत फक्त 1.79 कोटींची कमाई केली होती. याशिवाय ‘एक चतुर नार’, ‘बंगाल फाइल्स’सारखे चित्रपटही दशावतारच्या मागे पडले आहेत.
हा सिनेमा सुबोध खानोलकर दिग्दर्शित असून ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊसची निर्मिती आहे. यात अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, सिद्धार्थ मेनन, भरत जाधव, महेश मांजरेकर यांसह अनेक कलाकार झळकले आहेत. संगीतकार अजय–अतुल यांनी गाणी सजवली असून गुरू ठाकूर यांनी गीतलेखन केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही शो आणि ओटीटीवरील नवीन अपडेट्स, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो. वेगवान, स्पष्ट आणि फॅक्ट-बेस्ड रिपोर्टिंग करणं हे माझं वैशिष्ट्य आहे.
