कलर्स मराठीने सादर केलेली नवीन मालिका ‘बाईपण जिंदाबाद’ सध्या प्रेक्षकांच्या जबरदस्त पसंतीस उतरली आहे. दररोजच्या मालिकांचा फॉर्म्युला मोडत ही मालिका फक्त रविवारी रात्री प्रसारित केली जाते — आणि हीच नवी कल्पना सध्या जबरदस्त हिट ठरत आहे.
२६ ऑक्टोबर रोजी दाखवण्यात आलेल्या पहिल्या एपिसोडमध्ये ‘असिस्टंट माझी लाडकी’ ही कथा दाखवली गेली. यात अभिनेत्री प्रार्थना बेहेरे बॉसच्या भूमिकेत तर सुकन्या मोने असिस्टंटच्या भूमिकेत दिसली. हा भाग पाहून प्रेक्षक अक्षरशः खुश झाले आहेत.
या मालिकेबद्दल सोशल मीडियावर अशा प्रतिक्रिया उमटत आहेत —
“रोजचा नेहमीचा ड्रामा नाही, अगदी वेगळं आणि ताजं वाटलं”,
“हा तर टीव्हीवरील पहिला सिनेमा वाटला”,
“एकाच दिवशी एक पूर्ण कथा संपते ही गोष्ट खूप आवडली”,
“प्रार्थना आणि सुकन्याचा अभिनय एक नंबर”,
“व्हिलन किंवा अनावश्यक ताणतणाव नाही — त्यामुळे रिलॅक्स वाटलं.”
प्रेक्षकांनी विशेष कौतुक केलंय की दररोजचा ताण न देता ही मालिका प्रत्येक रविवारी एक वेगळी कथा पूर्ण करते, ज्यामुळे कंटाळा येत नाही आणि कथा अधांतरी राहत नाही.
आता ‘बाईपण जिंदाबाद’चा दुसरा भाग २ नोव्हेंबर रात्री ८ वाजता प्रक्षेपित होणार आहे. हा भाग ‘मच्छीका पानी’ नावाने दाखवला जाणार असून दोन आईंची भावनिक कहाणी केंद्रस्थानी असेल.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
