जय दुधाणे-हर्षला पाटीलच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता; केळवण संपन्न

Jay Dudhane: मनोरंजनविश्वात सध्या लग्नसराई जोरात सुरू आहे. ‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता सूरज चव्हाण यानंतर आता बिग बॉस मराठीमधील आणखी एक अभिनेता विवाहबंधनात अडकणार आहे. अभिनेता जय दुधाणे लवकरच लग्न करणार असून, नुकतेच त्याचे केळवण पार पडले आहे.

लालबाग-ठाणे येथील ‘माजघर’मध्ये जय दुधाणेचा केळवण सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी सुंदर सजावट करण्यात आली होती. केळीच्या पानावर ‘जयचं केळवण’ असे लिहिलेले दिसत होते. मराठमोळ्या रितीरिवाजात जयचे औक्षण करण्यात आले.

केळवणाच्या कार्यक्रमात जयसमोर पंचपक्वानांचे ताट ठेवण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रमात जय खूपच आनंदी दिसत होता. हा खास सोहळा जयच्या कुटुंबीयांनी आयोजित केला होता. सोशल मीडियावर या केळवणाचे व्हिडीओ आणि फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.

जय दुधाणे लवकरच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि युट्यूबर हर्षला पाटील हिच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. हे दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. काही महिन्यांपूर्वी जयने मसुरी येथे हर्षलाला प्रपोज करत आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. तो क्षण चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला.

जय दुधाणेने आजवर अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला आहे. तो ‘बिग बॉस मराठी 3’ मध्ये झळकला होता. याशिवाय तो Splitsvilla 13 चा विजेता ठरला असून, बिग बॉस मराठी 3 मध्ये उपविजेता राहिला होता. ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेतही त्याने काम केलं आहे. आता चाहते त्याच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page