बिग बॉस मराठी 6 ला मुहूर्त ठरला; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली

Bigg Boss Marathi 6: लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस मराठी 6 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बहुचर्चित सीझनची अधिकृत तारीख आता समोर आली आहे. हा शो 11 जानेवारी 2026 पासून दररोज रात्री 8 वाजता प्रेक्षक पाहू शकणार आहेत.

कलर्स मराठी आणि जिओहॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सीझन एकाच वेळी प्रसारित होणार आहे. यासोबतच शोचा पहिला प्रोमोही नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

प्रोमोमध्ये रितेश देशमुख यांचा दमदार अंदाज पाहायला मिळतो. “स्वागताला दारं उघडी ठेवा! मी येतोय” हा त्यांचा संवाद प्रेक्षकांच्या लक्षात राहणारा ठरत आहे. मागील सीझनप्रमाणेच यंदाही रितेश भाऊच शोचं सूत्रसंचालन करणार असल्याने प्रेक्षकांना पुन्हा एकदा मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.

नव्या सीझनचा प्रोमो भव्य स्वरूपात सादर करण्यात आला आहे. ढोल-ताशांचा गजर, झगमगती रोषणाई आणि प्रेक्षकांचा उत्साह यामुळे या सीझनची वेगळी झलक दिसते. त्यामुळे यंदाची थीम नेमकी काय असणार, याबद्दलही चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, स्पर्धकांची अधिकृत यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र सोशल मीडियावर विविध नावांची जोरदार चर्चा रंगली आहे. कोणते कलाकार आणि इन्फ्लुएन्सर्स घरात जाणार, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

एकूणच, बिग बॉस मराठी 6 ची घोषणा मराठी मनोरंजन विश्वात चर्चेचा विषय ठरली आहे. रितेश देशमुख यांच्या होस्टिंगसह हा सीझन पुन्हा एकदा भरपूर ड्रामा आणि मनोरंजन घेऊन येणार, अशी अपेक्षा प्रेक्षक व्यक्त करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page