Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस १९’चा ग्रँड फिनाले जवळ येत असताना आता मराठी प्रेक्षकांमध्ये एक नवा अंदाज सुरू झालाय. कलर्स मराठीने नुकताच एक छोटा प्रोमो शेअर केला आणि त्यानंतर सोशल मीडियावर चर्चा पुन्हा पेटली—‘बिग बॉस मराठी ६’ लवकरच सुरू होणार का?
मराठीत आजवर पाच सीझन झाले आहेत. गेल्या वर्षीचा पाचवा सीझन बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याने होस्ट केला होता. सूरज चव्हाण त्या सीझनचा विजेता ठरला होता. आता चॅनेलने टाकलेल्या नव्या व्हिडिओमुळे प्रेक्षकांची उत्सुकता अजून वाढली आहे. कॅप्शनमध्ये “उद्या संध्याकाळी काहीतरी धमाकेदार येणार” असा उल्लेख आहे. त्यामुळे हा प्रोमो बिग बॉससाठीच आहे का, असा मोठा सवाल निर्माण झालाय.
नेटकरी मात्र थेटच अंदाज वर्तवत आहेत. व्हिडिओखाली “BIGG BOSS मराठी ६”, “बिग बॉस प्रोमो”, “मराठी बिग बॉस” अशी अनेक कमेंट्स दिसत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर बिग बॉसचं नाव सतत ट्रेंडमध्ये आहे.
यावेळी खरंच बिग बॉस मराठीचा नवा सीझन सुरू होणार का, की कलर्स मराठी एखादा वेगळाच शो आणत आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण या प्रोमोमुळे चाहत्यांची धडधड वाढली आहे, हे मात्र नक्की.
पाचव्या पर्वात अनेक कलाकार आणि सोशल मीडिया क्रिएटर्स सहभागी झाले होते. टॉप २मध्ये अभिजित सावंत आणि सूरज चव्हाण पोहोचले होते. आता सहावा सीझन कधी सुरू होणार? आणि यंदाही रितेश देशमुखच होस्ट असणार का? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
