Bigg Boss Marathi 6: कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 6 सुरू होऊन चार आठवडे पूर्ण झाले आहेत. आता चौथ्या आठवड्याचं एलिमिनेशन जवळ आलं आहे. यावेळी तब्बल आठ स्पर्धक नॉमिनेट झाले असून घरात डबल एव्हिक्शन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या आठवड्यात दिव्या शिंदे, रोशन भजनकर, सचिन कुमावत, राकेश बापट, अनुश्री माने, प्रभू शेळके, दीपाली सय्यद, आयुष संजीव आणि ओमकार राऊत हे स्पर्धक नॉमिनेशनमध्ये आहेत. कोण घराबाहेर जाणार याबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
वोटिंग ट्रेंडमध्ये यावेळी काही बदल पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला दीपाली सय्यद यांना चांगला प्रतिसाद मिळत होता, मात्र आता त्यांचा ग्राफ खाली घसरलेला दिसतोय. आयुष संजीव यांनाही प्रेक्षकांचा पाठिंबा अपेक्षेइतका मिळताना दिसत नाही.
सध्या ट्रेंडनुसार पहिल्या क्रमांकावर रोशन भजनकर आहेत. त्यांच्यानंतर दिव्या शिंदे, सचिन कुमावत, राकेश बापट, प्रभू शेळके आणि अनुश्री माने हे स्पर्धक सुरक्षित झोनमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र डेंजर झोनमध्ये आयुष संजीव, ओमकार राऊत आणि दीपाली सय्यद असल्याचं दिसत आहे.
सोशल मीडिया रिपोर्टनुसार दीपाली सय्यद आणि आयुष संजीव घराबाहेर जाण्याची शक्यता जास्त आहे. मात्र ऐनवेळी परिस्थिती बदलून ओमकार राऊत यांचाही प्रवास इथेच थांबू शकतो, असंही बोललं जात आहे.
नेमकं कोण बाहेर पडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना रविवारपर्यंत वाट पाहावी लागेल. बिग बॉस मराठी सीझन 6 दररोज रात्री 8 वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर पाहायला मिळतो.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
