Bigg Boss 19 Pranit More: ‘बिग बॉस 19’चा रविवारीचा भाग प्रेक्षकांसाठी धक्कादायक ठरला. डबल इव्हिक्शनमुळे घरात खळबळ माजली. या आठवड्यात शोमधून अभिषेक बजाज आणि नीलम गिरी बाहेर पडले.
या वीकेंडला प्रणीत मोरेची पुन्हा एंट्री झाली आणि त्याला खास अधिकार देण्यात आला होता. नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांपैकी एकाला वाचवण्याचा निर्णय त्याच्या हातात होता. बॉटम थ्रीमध्ये अभिषेक, नीलम आणि अशनूर कौर होते. प्रणीतनं शेवटी अशनूरला सेफ केलं आणि त्यानंतर अभिषेक व नीलम बाहेर पडले.
सलमान खाननं शोमध्ये सांगितलं की, गेल्या आठवड्यात प्रणीत कॅप्टन होता आणि आरोग्याच्या कारणामुळे घराबाहेर गेला होता. त्यामुळे त्याला हा अधिकार मिळाला. पण त्याचा निर्णय पाहून चाहत्यांनी संताप व्यक्त केला.
सोशल मीडियावर अभिषेकच्या समर्थनार्थ पोस्ट्सचा वर्षाव झाला आहे. चाहत्यांचं म्हणणं आहे की, “प्रणीतनं चुकीचा निर्णय घेतला, त्यानं अभिषेकला वाचवायला हवं होतं.” काहींनी तर त्याला “विश्वासघातकी” असं संबोधलं.
फॅन्सचं म्हणणं आहे की, अभिषेकने दोन महिन्यांत प्रेक्षकांची मनं जिंकली. तो ट्रॉफीच्या शर्यतीत राहायला हवा होता. अनेकांनी प्रणीतवर आरोप केला की, त्यानं अभिषेकला मित्र म्हणत जवळ ठेवलं, पण शेवटी त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला.
सध्या ट्विटरवर “Abhishek Bajaj Eviction” हा ट्रेंड जोरात आहे. फॅन्स प्रणीतकडून उत्तराची मागणी करत आहेत, तर शोचं पुढचं वळण काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
