बिग बॉसच्या घरात फक्त भांडणं आणि वादच होतात असं नाही. कधी कधी इथे अशी नाती तयार होतात जी शो संपल्यानंतरही तशीच घट्ट राहतात – मग ती मैत्रीची असोत, प्रेमाची किंवा भाऊ-बहीणीसारखी.
मराठी बिग बॉस सीझन 5 मध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंकिता प्रभू वालावलकर आणि धनंजय पोवार उर्फ डीपी दादा यांचं असंच गोड भाऊ-बहीणीचं नातं तयार झालं. गेल्या वर्षी अंकिताने बिग बॉसच्या घरात डीपीला राखी बांधली होती.
यावर्षी मात्र रक्षाबंधनाच्या दिवशी अंकिता भारतात नाही. तरीही तिने आधीच डीपीसाठी खास गिफ्ट पाठवून हे सणाचं औचित्य जपलं.
गिफ्टसोबत आलेली भावूक चिठ्ठी
डीपीने आपल्या YouTube चॅनलवर हा गिफ्ट अनबॉक्स करताना व्हिडिओ शेअर केला. त्यात अंकिताने पाठवलेले काही शर्ट आणि एक भावूक पत्र दिसतं.
पत्रात अंकिता लिहिते –
“प्रिय डीपी दादा, गेल्यावर्षी बिग बॉसच्या घरात मी तुम्हाला राखी बांधली होती. ते दिवस आठवले की अजूनही अंगावर काटा येतो. त्या वेळी आपण एकमेकांचा आधार होतो. यावर्षी मी भारताबाहेर असले तरी आपलं नातं साजरं व्हायलाच हवं. म्हणून तुमच्या स्टाईलचे काही शर्ट पाठवते आहे. आवडले तर रक्षाबंधनाच्या दिवशी नक्की घाला. माझ्या नावाची राखी ताईकडून बांधून घ्या. मला गिफ्ट नको, पण खरी गरज असेल तेव्हा हक्काने मला हाका. गेल्यावर्षी दिलेला आधार मी कधीच विसरणार नाही. जास्त रागावत नाही, पण चुका कमी व्हाव्यात म्हणून कधी कधी ऐकवते. त्यासाठी तुमच्या बाबांसोबत बसावं लागलं तरी चालेल. रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा… तुमचं वादळ.”
डीपीचा मजेशीर प्रतिसाद
अंकिताच्या या गिफ्टवर डीपीने हसत-हसत उत्तर दिलं –
“खूप खूप धन्यवाद! मी तुला गिफ्ट देणारच होतो, पण तू भारतात नाही आणि मी परदेशात येण्याइतकी ऐपत नाही. नाहीतर थेट बालीला आलो असतो. पण तू म्हणालीस की काही नको, त्यामुळे हाताश झालो. तरीही जेव्हा तू परत येशील तेव्हा तुझ्या आवडीचं गिफ्ट देईन. असंच प्रेम राहू दे.”
बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाण, डीपी आणि अंकिता यांची तिघांची खास गट्टी होती. शो संपल्यानंतरही दोघांनी अंकिताला बहिण मानून तिची काळजी घेतली. तिच्या लग्नात तर डीपीने भावाची सगळी जबाबदारी पार पाडली होती.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
