Bigg Boss 19 च्या नुकत्याच झालेल्या ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये बसीर अली आणि नेहल चुडासमा यांना डबल एलिमिनेशनद्वारे बाहेरचा मार्ग दाखवण्यात आला. नेहल बाहेर जाणार अशी चर्चा आधीपासून होती, पण बसीरचं एव्हिक्शन प्रेक्षकांपासून घरातील सदस्यांपर्यंत सर्वांसाठीच अनपेक्षित ठरलं.
बिग बॉसमध्ये काही आठवड्यांपूर्वी झालेल्या डायनासॉर टास्कदरम्यान बसीर आणि प्रणित यांच्यात जोरदार वाद झाला होता. त्यावेळी त्यांनी एक पैज लावली होती — जो आधी घराबाहेर जाईल, त्याला दुसऱ्याचं ऐकावं लागेल. ही गोष्ट सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत होती.
घरातून बाहेर पडताच बसीरने याबद्दल प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “संपूर्ण जगासमोर मी ती पैज स्वीकारली होती तर मागे हटण्याचा प्रश्नच नाही. एलिमिनेशनवेळी मी जेव्हा सर्वांचा निरोप घेत होतो, तेव्हा गार्डन एरियामध्ये प्रणित उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर अक्षरशः रडू ओघळत होतं, तो खूप भावुक झाला होता.”
तो पुढे म्हणाला, “मी त्याला म्हटलं — ‘अरे तू पैज जिंकलास!’ पण त्याने मला मिठी मारली आणि शांत केलं. प्रणितचा प्रवास जेव्हा संपेल आणि तो घराबाहेर येईल, तेव्हा त्या पैजेबाबत आम्ही निर्णय घेऊ. मी दिलेला शब्द मी मोडणार नाही.”
या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर बसीरबद्दल प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. चाहत्यांचा विश्वास आहे की दोघांमधील नातं स्पर्धेपलीकडचं आहे आणि हा स्पिरिट खरोखरच आदरणीय आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही शो आणि ओटीटीवरील नवीन अपडेट्स, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो. वेगवान, स्पष्ट आणि फॅक्ट-बेस्ड रिपोर्टिंग करणं हे माझं वैशिष्ट्य आहे.
