Anushree Mane Boyfriend: बिग बॉस मराठी सीजन 6 सुरू झाला असून घराघरात या शोची जोरदार चर्चा आहे. प्रेक्षक आपल्या आवडत्या स्पर्धकांना सोशल मीडियावरून पाठिंबा देत आहेत. काही स्पर्धकांनी कमी वेळातच वेगळा फॅन बेस तयार केला आहे, तर काहींचं वागणं प्रेक्षकांना खटकत आहे.
या आठवड्याची सुरुवात राकेश बापटवर झालेल्या आरोपांमुळे झाली. सोशल मीडिया रिलस्टार अनुश्री माने हिने राकेशवर गंभीर आरोप केले. तिला रुचिता जामदारनेही साथ दिली. अनुश्रीने सांगितलं की, ती झोपेत असताना राकेशने तिचा हात ओढून तिला उठवलं आणि तिच्या परवानगीशिवाय स्पर्श केला. या आरोपांमुळे घरात वातावरण तंग झालं.
राकेशला हे आरोप मान्य नव्हते. घरातील इतर स्पर्धकांनीही अनुश्री आणि रुचिता यांच्या आरोपांविरोधात आवाज उठवला. तन्वी कोलते, सागर कारंडे, आयुष, दिपाली, ओमकार आणि दिव्या यांनी राकेशची बाजू घेतली. तरीही अनुश्री आणि रुचिता आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या.
या प्रकरणानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी हे सगळं केवळ फुटेजसाठी केलं जात असल्याचं म्हटलं. तर काहींनी अनुश्रीसारख्या नव्या कलाकारांनी सीनियर अभिनेत्यांशी बोलताना संयम राखावा, असं मत व्यक्त केलं.
या सगळ्या चर्चांमुळे अनुश्री मानेबद्दल लोक अधिक माहिती शोधू लागले. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले. यातून समोर आलं की अनुश्री माने ही तिच्या मावस बहिणीच्या दीरासोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्या मुलाचं नाव अर्जुन मोरे असं होतं. अर्जुन अनुश्रीपेक्षा 8 वर्षांनी मोठा होता. त्या काळात अनुश्री 19 वर्षांची होती, तर अर्जुन 27 वर्षांचा होता.
अनुश्रीने या नात्याची सोशल मीडियावर उघडपणे कबुली दिली होती. तिने त्याच्यासोबतचे फोटो शेअर करत “माय लव्ह” असंही लिहिलं होतं. मात्र 2024 मध्ये या दोघांचा ब्रेकअप झाला. सध्या तिच्या फॅन पेजवर हे जुने फोटो पुन्हा व्हायरल होत आहेत.
अनुश्री माने ही एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून तिचे इंस्टाग्रामवर सुमारे 1.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. तिने अनेक गाण्यांमध्येही काम केलं आहे. बिग बॉसच्या घरात सहभागी होण्यापूर्वी तिचं स्पर्धक आयुष्याशी संबंधित गाणं देखील रिलीज झालं होतं.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
