Ankita Walawalkar: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातून चर्चेत आलेली आणि सोशल मीडियावर सक्रिय असलेली अंकिता वालावलकर सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. इंडोनेशिया ट्रिपदरम्यान तिने स्कुबा डायव्हिंगचा अनुभव घ्यायचं ठरवलं, पण हा अनुभव तिच्यासाठी धोकादायक ठरला. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे तिची तब्येत बिघडली आणि नाकातून रक्त येऊ लागलं. देवाच्या कृपेने मोठा अनर्थ टळला, असं तिने सांगितलं.
अंकिताने या घटनेबद्दल सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत सांगितलं की, “इंडोनेशियातील माझी चौथी डाइव्ह पूर्ण झाली होती, पाचवी डाइव्ह बाकी होती. पण अचानक परिस्थिती बदलली. डाइव्ह मास्टरने आम्हाला जोरात पाण्यात खेचलं आणि मी अंदाजच लावू शकले नाही. लगेच नाकातून रक्त वाहायला लागलं आणि मी बाहेर आले. बाहेर आल्यानंतर लोक विचारत होते काय झालं, पण आम्ही फक्त सांगितलं – ठेवा पैसे, आम्हाला अजून काही नको.”
तिने पुढे सांगितलं, “त्या वेळी पाण्याचा करंट खूप जास्त होता. आम्ही त्या प्रवाहात अडकलो होतो. देवाच्या कृपेने वाचलो. आमच्यातील एक मित्र तर सुरुवातीच्या ठिकाणापासून दीड किलोमीटर पुढे जाऊन बाहेर आला. खूपच रिस्की होतं ते. ऍडव्हेंचर नक्की होतं, पण सुरक्षित नव्हतं. हॉटेलमध्ये परतल्यावर थोडा वेळ रिलॅक्स झाल्यावर आता ठीक वाटतंय.”
अंकिताच्या या अनुभवाने तिच्या चाहत्यांना धक्का बसला असून, सोशल मीडियावर तिच्या सुरक्षिततेसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
