Akash Nalawade: मराठी मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारा लोकप्रिय अभिनेता आकाश नलावडे आपल्या वैयक्तिक आयुष्यात एका नवीन पर्वासाठी सज्ज झाला आहे. 8 सप्टेंबर रोजी वाढदिवसाच्या दिवशीच त्याने चाहत्यांसोबत ही खास गोड बातमी शेअर केली.
आकाश आणि त्याची पत्नी, अभिनेत्री रुचिका धुरी, लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत. रुचिकाने इन्स्टाग्रामवर प्रेग्नन्सी किटचा फोटो शेअर करत लिहिलं – “आम्हाला जपून ठेवावे लागलेले सर्वात कठीण गुपित!” हा पोस्ट आकाशनेही रिपोस्ट केला आणि चाहत्यांसोबत आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर #babyarriving #happiness #love #newmember असे हॅशटॅग्सही वापरले.
2022 मध्ये आकाश-रुचिकाचा साखरपुडा झाला होता आणि 18 मार्च 2023 रोजी त्यांनी लग्नगाठ बांधली. मालिकाविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला होता. आता लग्नानंतर जवळपास अडीच वर्षांनी या जोडीने Good News दिल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
सध्या आकाश स्टार प्रवाहवरील ‘साधी माणसं’ मालिकेत सत्या या भूमिकेत झळकतो आहे. त्याची ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड भावते. याआधी त्याने ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत पश्या ही भूमिका साकारून लोकप्रियता मिळवली होती. सोशल मीडियावर पोस्ट झळकताच चाहत्यांसह मालिकाविश्वातील कलाकारांकडूनही या दाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
