कन्नड–मराठीचा अनोखा संगम! AFTER OLC ट्रेलरला प्रेक्षकांची दाद

After OLC Trailer: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या नवनवीन प्रकल्पांची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात आता ‘आफ्टर OLC’ हा नवा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि पाहताच प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली.

ट्रेलरच्या सुरुवातीलाच वातावरणात एक अज्ञात तणाव जाणवतो. मैत्री, विश्वासघात आणि बराच काळ दडलेलं एक गूढ — या सगळ्यांचा संगम असलेली कथा मोठ्या पडद्यावर काय वळण घेणार याची चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. एक्शन सीन्स, थरार आणि भावना यांची मिश्रण असलेली कहाणी यात आहे, हे ट्रेलर स्पष्ट दाखवतो.

कलाकारांचा अभिनय, दिग्दर्शन आणि लोकेशन्समधील वास्तवता हे ट्रेलरमधील मुख्य आकर्षण आहे. हा चित्रपट कन्नड आणि मराठी चित्रपटसृष्टीला जोडणारा एक अनोखा संगम ठरत आहे. दोन्ही उद्योगांतील कलाकार, निर्माते आणि संगीत क्षेत्रातील दिग्गज या प्रकल्पात एकत्र येत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा अनुभव विशेष ठरण्याची चिन्हे आधीच दिसत आहेत.

चित्रपटात कवीश शेट्टी, मेघा शेट्टी, शिवानी सुर्वे आणि विराट मडके यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्यासोबत प्रसाद खांडेकर, अश्विनी चवरे आणि इतर कलाकारही दिसणार आहेत. कथा नक्षलवादी पार्श्वभूमीवर आधारित असून, ट्रेलरमध्ये दाखवलेली लोकेशन्सही त्या भागातील असल्याचे दिसते. संगीतही लक्ष वेधून घेणारं आहे. गीतकार क्षितिज पटवर्धन आणि मंदार चोळकर यांनी गीतं लिहिली आहेत, तर अवधूत गुप्ते, वैशाली सामंत आणि रोहित राऊतसह अनेक गायकांनी आवाज दिला आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन सडागारा राघवेंद्र यांनी कन्नड आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये केलं आहे. निर्मितीची धुरा दीपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म फॅक्टरीने सांभाळली आहे. ‘आफ्टर OLC’ २८ नोव्हेंबरला मराठी, हिंदी आणि कन्नड भाषेत जगभर प्रदर्शित होणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page