Gautami Patil: गायक अभिजीत सावंत आणि नृत्यांगना गौतमी पाटील यांचा काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक AI व्हिडीओ झपाट्याने व्हायरल झाला. दोघांनीही हा व्हिडीओ स्वतःच्या अकाऊंटवरून शेअर केला होता, आणि त्यानंतर नेटिझन्समध्ये मोठी चर्चा सुरू झाली. रोमँटिक अंदाजातील त्या दृश्यांनी चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या.
आता या व्हिडिओमागचं खरं कारण समोर आलं आहे. अभिजीत लवकरच नवीन गाणं घेऊन येत आहे आणि त्या गाण्यात गौतमी देखील त्याच्यासोबत झळकणार आहे. गाण्याचं नाव ‘रुपेरी वाळूत’ असून 5 डिसेंबरला ते प्रदर्शित होणार आहे. हे गाणं जुन्या गाण्याचा नवा ट्विस्ट असणार की पूर्णपणे वेगळं, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
अभिजीतने यंदा ‘चाल तुरू तुरू’ आणि ‘मोहब्बते लुटाऊंगा’ सारखी अनेक हिट गाणी प्रेक्षकांसमोर आणली. त्याच्या आवाजाने प्रेक्षक भुरळ घालतच आहेत. आता ‘रुपेरी वाळूत’मधील त्याची आणि गौतमीची जोडी पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.
समुद्रकिनाऱ्यावरचे फोटो दोघांनी शेअर केल्यानंतर चाहत्यांचा अंदाज आधीच सुरू झाला होता. ‘रुपेरी वाळूत माडाच्या बनात..’ हे जुनं गाणं प्रचंड लोकप्रिय होतं, त्यामुळे त्याचं हे नवीन रूप कसं असणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांमध्ये नेहमीच प्रचंड गर्दी असते. तिच्याशी वाद आणि चर्चा कायम जोडल्या जातात. स्टेज शोसोबत तिने काही मराठी चित्रपटांच्या गाण्यांमध्येही काम केलं आहे. आता अभिजीतसोबतचा हा अल्बम चाहत्यांसाठी मोठं आकर्षण ठरत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, वेब सिरीज आणि टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील ताज्या बातम्या, ट्रेंड्स आणि अपडेट्स वाचकांपर्यंत जलदगतीने पोहोचवतो. सत्य माहिती आणि सोप्या भाषेत रिपोर्टिंग करणं ही माझी ओळख आहे.
