‘अभंग तुकाराम’ मध्ये उलगडणार संत तुकारामांच्या गाथेचा थरार आणि भक्ती

Abhanga Tukaram Movie: संत तुकाराम महाराजांच्या अभंगांची गाथा आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा अभंग तुकाराम हा चित्रपट ७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असून, प्रस्तुतकर्ता म्हणून पॅनोरमा स्टुडिओज काम पाहत आहेत.

सुमारे ३५० वर्षांनंतरही तुकोबांचे अभंग, म्हणी आणि वाक्प्रचार मराठी जनजीवनात आजही तितक्याच जिवंत आहेत. त्यांची रचना फक्त आध्यात्मिक नाही, तर समाजातील बदल घडवणारी होती. याच विचारधारेचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात येत आहे.

कथानक एका ऐतिहासिक प्रसंगावर आधारित आहे. तत्कालीन धर्ममार्तंडांनी तुकोबांच्या अभंग गाथा इंद्रायणी नदीत बुडवण्याचा आदेश दिला होता. तुकाराम महाराजांनी हे आव्हान स्वीकारून स्वतः गाथा नदीत सोडल्या. पुढे त्या गाथा पाण्यावर कशा तरल्या, त्या प्रसंगातून कोणता संदेश मिळाला आणि भक्तांनी त्यासाठी काय त्याग केला, हे या चित्रपटात भावस्पर्शी आणि थरारक पद्धतीने दाखवले आहे.

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या मोशन टिझर पोस्टरमध्ये पाण्याच्या लाटांवर तरंगणारे अभंगांचे कागद, पाठमोरे उभे असलेले तुकोबाराय आणि त्यांच्या समोर उगवणारा सूर्य अशा प्रभावी दृश्यांचा समावेश आहे. पार्श्वभूमीला “जेथे जातो तेथे तू माझा सांगाती” ही अमर रचना ऐकू येते, जी शीर्षकासोबतच चित्रपटाचा आत्मा स्पष्ट करते.

या चित्रपटाची कथा आणि संवाद योगेश सोमण यांनी लिहिले आहेत. पटकथा व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. वारकरी परंपरेवर आधारित संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई नंतर त्यांनी पुन्हा एकदा या परंपरेचा अभ्यास आणि अनुभव मोठ्या पडद्यावर आणला आहे. संगीतकार अवधूत गांधी यांनी तब्बल १० अभंगांचा समावेश असलेल्या या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी सांभाळली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page