गुजराती तरुणीचा मराठी प्रेक्षकांना सवाल, ‘आपल्या चित्रपटांना का साथ देत नाही?’

एक गुजराती तरुणी मराठी सिनेमा पाहायला थिएटरमध्ये गेली. आत गेली तेव्हा समोर दिसलं ते रिकामं थिएटर.

ती एकटीच नव्हती, मित्रही सोबत होता. पण हॉलमध्ये एवढेच दोघ. बाकी सगळ्या जागा रिकाम्या.

ही तरुणी आहे आरती बोरीचा. ती पाहायला गेली होती आदि अनंत हा मराठी चित्रपट. आणि तिने पाहिलेलं रिकामं थिएटर तिनेच व्हिडीओत टाकलं. तो व्हिडीओ आता व्हायरल होतोय.

व्हिडीओत ती म्हणते, “आपण बोलतो ना की मराठी सिनेमाची परिस्थिती का खराब आहे, कलाकारांना यश का मिळत नाही. आज मी आदि अनंत चित्रपट बघायला आले होते. आणि या थिएटरमध्ये मी आणि माझ्या मित्राशिवाय कोणीही नाहीये.”

ती पुढे सांगते, तेव्हा इंटर्व्हलची वेळ होती. चित्रपटात अशोक सराफांसारखे दिग्गज कलाकार आहेत. तरीही मराठी लोकच चित्रपट पाहायला येत नाहीत हे पाहून तिला खूप वाईट वाटतं.

आणि मग ती सांगते तिचं खरं वैशिष्ट्य. “मी गुजराती आहे. तरीही मी हा चित्रपट पाहायला आलेय. कारण मी महाराष्ट्राची संस्कृती आणि मराठी भाषा यांचा खूप आदर करते.”

तिचं म्हणणं पुढेही भावसंवेदनशील आहे. मराठी माणूसच मराठी चित्रपटाला येत नाही, तर कसा चालणार चित्रपट, असा ती सवाल करते.

“तुम्ही तुमच्याच कलाकारांना सपोर्ट करत नाही, सिनेमाला सपोर्ट करत नाही. आपणच आपल्या माणसाला सपोर्ट करत नाही आणि मग म्हणतो की आपण पुढे जात नाही. असं कसं चालणार?” असं ती विचारते.

शेवटी तिचं आवाहनही आहे. थोडा कलाकारांचा आदर करा आणि चित्रपटाला या, अशी ती विनंती करते.

आरतीच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आणि त्यातून मराठी चित्रपटांभोवतीचे प्रश्नही पुढे आले आहेत.

एका युजरने म्हटलं, “मराठी पिक्चर येतात कधी तेच कळत नाही. मार्केटिंग नाही, ट्रेलर नाही, काही कळायला तरी हवे.”

अजून एका कमेंटमध्ये म्हटलं गेलं, “आज महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे त्याला फक्त आणि फक्त मराठी माणूस जबाबदार आहे.”

काहींनी मात्र सकारात्मिक प्रतिक्रिया दिली. “मी बघितला, खूप भारी चित्रपट आहे. शेवट खूप इमोशनल आहे, सगळ्यांनी जाऊन नक्की बघा,” असं एका युजरने लिहिलं.

“हिंदी सिनेमा बघायला लगेच मराठी माणसं जमा होतात,” अशी टिप्पणीही आली. तसंच, “मी फक्त मराठी पिक्चर बघायला थिएटरला जाते,” असंही एकाने सांगितलं.

एका कमेंटमध्ये चित्रपटांच्या प्रचाराची कमतरता मांडण्यात आली. “मराठी चित्रपट वाहिन्यांवर सर्व दाखवतात, पण चित्रपट दाखवत नाहीत. आणि एंटरटेनमेंटच्या नावाने फालतू पीजे कॉमेडी करतात,” अशी नाराजीही व्यक्त झाली.

एका गुजराती तरुणीच्या या सवालाने मराठी प्रेक्षकांना विचार करायला लावलं आहे. आपली भाषा, आपले कलाकार यांना आपणच साथ देत नाही, तर चित्रपट कसा चालणार, हाच मुद्दा आता चर्चेत आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page