ड्रायव्हरच्या हाताला गोळी, दोघे जखमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारात टायगर श्रॉफचा ड्रायव्हर फिरदौस याच्या हाताला गोळी लागली. घटनास्थळी उपस्थित असलेली आणखी एक व्यक्तीही जखमी झाली. वृत्तानुसार, जखमी व्यक्ती रिक्षाचालक असल्याचं सांगितलं जात आहे.
या घटनेत एकूण दोन जण जखमी झाले असून, टायगर श्रॉफ पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती डीसीपी मोहित गर्ग यांनी दिली. ड्रायव्हरची प्रकृती स्थिर असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
तीन हल्लेखोर घटनास्थळावरून फरार
प्राथमिक माहितीनुसार, या गोळीबारात तीन हल्लेखोर सहभागी होते. गोळीबार केल्यानंतर ते घटनास्थळावरून पसार झाले. हल्ल्यामागचं नेमकं कारण काय, तसेच हल्लेखोर कोण आहेत, याबाबत अधिक तपशील समोर येणं बाकी आहे.
मुख्यमंत्र्यांचे मुंबई पोलिसांना आदेश
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला. त्यांनी गोळीबाराच्या घटनेचा तपास वेगाने करण्याचे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
आता या प्रकरणात पोलिसांच्या तपासातून कोणती माहिती समोर येते आणि फरार हल्लेखोरांना कधी पकडलं जातं, याकडे लक्ष लागलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
