Bigg Boss 20: ११ स्पर्धक डेंजर झोनमध्ये, या ३ सदस्यांना मिळाला मोठा दिलासा

Bigg Boss 20 Nomination: ‘बिग बॉस २०’च्या घरात चौथा आठवडा सुरू होताच नॉमिनेशनचा खेळ चांगलाच रंगला आहे. नुकत्याच झालेल्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानने स्काउट, आसिफ खान यांच्यासह काही स्पर्धकांची कानउघाडणी केली. याच भागात पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीचा बिग बॉसच्या घरातील प्रवासही संपला.

ईशाच्या एक्झिटनंतर आता नव्या आठवड्यात नॉमिनेशनचा टास्क पार पडला. या टास्कमध्ये स्पर्धकांना जोड्यांमध्ये विभागण्यात आले होते. दोन्ही स्पर्धकांनी परस्पर संमतीने कोणाला नॉमिनेट करायचे, हे ठरवायचे होते. मात्र, अनेक जोड्यांमध्ये एकमत झाले नाही.

त्यामुळे या टास्कनंतर तब्बल ११ स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. रिती तिवारी, आम्रपाली दुबे, माही विज, स्काउट, काझी तौकीर, उदिती सिंह, अमन गांधी, कनिका मान, यंग डीएसए, लव्हप्रीत गिल आणि मेरी कोम यांचा नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांमध्ये समावेश आहे.

रिती तिवारी आणि आम्रपाली दुबे यांच्यात कोणाला नॉमिनेट करायचे यावर सहमती झाली नाही. त्यामुळे दोघींनाही नॉमिनेट करण्यात आले.

यानंतर माही विज आणि अरिशफा खान यांची जोडी आली. माहीने स्वतःला नॉमिनेट करून अरिशफाला सुरक्षित केले. त्यानंतर आसिफ खान आणि स्काउट यांची जोडी होती. स्काउटने स्वतःला नॉमिनेट करत आसिफला सेफ केले.

काझी तौकीर आणि उदिती सिंह यांच्यातही नॉमिनेशनवर एकमत झाले नाही. त्यामुळे दोघांनाही नॉमिनेट करण्यात आले. अमन गांधी आणि कनिका मान यांच्या जोडीमध्येही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली.

शेवटी यंग डीएसए, लव्हप्रीत गिल आणि मेरी कोम यांच्या गटातही कोणाला नॉमिनेट करायचे यावर सहमती झाली नाही. त्यामुळे हे तिघेही डेंजर झोनमध्ये गेले.

या टास्कनंतर गुल्लू, अरिशफा खान आणि आसिफ खान हे तीन स्पर्धक या आठवड्यासाठी सुरक्षित झाले आहेत. त्यामुळे उर्वरित ११ स्पर्धकांवर आता एलिमिनेशनची टांगती तलवार आहे.

आता प्रेक्षकांच्या मतांमुळे यापैकी कोणाचा बिग बॉसच्या घरातील प्रवास पुढे सुरू राहतो आणि कोणाला घराबाहेर जावे लागते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page