‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेचा प्रवास संपणार; २ वर्षांनंतर प्रेक्षकांचा घेणार निरोप

छोट्या पडद्यावर सध्या मालिकांच्या कथांइतकाच त्यांच्या ऑफ-एअर होण्याचाही विषय चर्चेत आहे. स्टार प्रवाहने गेल्या महिन्यात सहा नव्या मालिकांची घोषणा केली होती. या नव्या मालिकांसाठी आता जुन्या मालिकांना निरोप देण्याची तयारी सुरू झाली आहे. यापूर्वी ‘हळद रुसली कुंकू हसलं’ ही मालिका बंद होणार असल्याची चर्चा होती. आता ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेचाही प्रवास संपणार आहे.

‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका जवळपास दोन वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती. मालिकेत राया आणि मंजिरीची जोडी मुख्य भूमिकेत होती. अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांनी या भूमिका साकारल्या. ही मालिका सोहम प्रोडक्शनची निर्मिती होती.

२७ मे २०२४ रोजी ‘येड लागलं प्रेमाचं’चा पहिला भाग प्रसारित झाला होता. सुरुवातीपासूनच मालिकेच्या कथेत अनेक ट्विस्ट आणि टर्न पाहायला मिळाले. राया हा गावगुंड असल्याचं दाखवण्यात आलं होतं. मात्र पुढे तो पोलीस अधिकारी आणि अंडरकव्हर एजंट असल्याचं समोर आलं.

दुसरीकडे मंजिरी तिच्या सासू-सासऱ्यांसोबत राहत होती. राया आणि मंजिरीच्या नात्यातील चढ-उतार, कौटुंबिक संघर्ष आणि कथेत येणारे वेगवेगळे ट्विस्ट यामुळे मालिका चर्चेत राहिली.

गेल्या काही महिन्यांपासून ‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका रात्री ११ वाजता प्रसारित केली जात होती. आता जवळपास दोन वर्षांनंतर मालिकेचा निरोप होणार आहे.

मालिकेच्या शेवटच्या दिवसाच्या शूटिंगसाठी संपूर्ण टीम सेटवर एकत्र आली होती. यावेळी कलाकार आणि टीमने केक कापून सेलिब्रेशन केलं. ‘We Are Signing Off!’ म्हणत कलाकारांनी या प्रवासाला निरोप दिला. सेटवरील या क्षणांचे फोटो आणि पोस्टही कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.

दरम्यान, स्टार प्रवाहकडून लवकरच ‘येड लागलं प्रेमाचं’च्या अंतिम भागाचा प्रोमो शेअर केला जाण्याची शक्यता आहे. मालिकेचा शेवट नेमका कसा होणार आणि राया-मंजिरीच्या नात्याचं काय होणार, याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page