मराठी अभिनेते विद्याधर जोशी यांनीही यावर उपरोधिक पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
विद्याधर जोशी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये सामान्य माणसाच्या अडचणी मांडताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. गेल्या काही वर्षांत परदेश प्रवास झालेला नाही, विमानाची तिकिटं महाग असल्याने पुढेही प्रवास शक्य नाही, असं त्यांनी म्हटलं. तसेच कामाच्या स्वरूपामुळे work from home शक्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
मुंबईतील पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि रोजच्या प्रवासाबद्दल बोलताना त्यांनी, “एकदा मोदी सर मुंबईत येऊन स्वतः वापरून बघतील तर गंमत कळेल,” असा टोला लगावला. घोडबंदर रोड, मीरा रोडसारख्या भागांमध्ये पोहोचताना किती वेळ जातो याचाही उल्लेख त्यांनी केला.
त्यांच्या पोस्टमध्ये वाढती महागाई, ऑर्गॅनिक वस्तूंचे दर आणि सोन्याच्या वाढलेल्या किंमतींचाही उल्लेख होता. “सोनं विकत घेण्याचा विचार मनात येणं म्हणजे मोठ्ठा विनोद,” असंही त्यांनी लिहिलं आहे.
याशिवाय शहरातील वाढत्या उष्णतेवरही त्यांनी भाष्य केलं. मुंबईत झालेल्या विकासामुळे उकाडा वाढल्याचं सांगताना त्यांनी गच्चीवर तवा ठेवून पोळ्या भाजता येतील का, अशी मिश्कील टिप्पणी केली.
सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्या पोस्टला पाठिंबा दिला आहे. काहींनी कमेंट करत सामान्य लोकांच्या भावना त्यांनी मांडल्याचं म्हटलं आहे. वाढती महागाई आणि सरकारच्या सल्ल्यांमुळे लोकांमध्ये नाराजी असल्याचंही अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, मोदी यांच्या आवाहनानंतर विरोधकांसोबतच अनेक नागरिकांनी सोशल मीडियावर टीका केली आहे. आता सरकार यावर काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
