स्ट्रगलर साला नंतर पुन्हा धमाका; कुशल, संतोष आणि अभिजीतची जोडी मोठ्या पडद्यावर

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या नव्या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. मैत्री, धम्माल, नॉस्टॅल्जिया आणि गोवा ट्रिपचा भन्नाट अनुभव घेऊन येणारा हा सिनेमा प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करत आहे.

दिग्दर्शक विजू माने यांच्या या चित्रपटात ‘स्ट्रगलर साला’मधून लोकप्रिय झालेली तिकडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजीत चव्हाण हे कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. विशेष म्हणजे या धमाल गँगमध्ये आता अंकुश चौधरी देखील सहभागी झाला आहे. त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

नुकतंच चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आणि त्यानंतर सोशल मीडियावर त्याची मोठी चर्चा सुरू झाली. पोस्टरमध्ये दिसणारी गोवा ट्रिपची मस्ती, मित्रांची धमाल आणि बेफिकीर अंदाज प्रेक्षकांना आकर्षित करत आहे.

चित्रपटाच्या पोस्टर लॉन्च सोहळ्यालाही अनेक मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार आणि संगीत दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.

या सिनेमाबद्दल बोलताना विजू माने यांनी सांगितलं की, प्रत्येकाच्या आयुष्यात मित्रांसोबत केलेल्या ट्रिप्सच्या खास आठवणी असतात. गोवा ट्रिप हा प्रत्येक फ्रेंड सर्कलमधला कायम चर्चेचा विषय असतो आणि त्याच अनुभवांना हा चित्रपट मजेशीर पद्धतीने मोठ्या पडद्यावर आणणार आहे.

चित्रपटात फक्त कॉमेडी नाही, तर मैत्रीतील भावना, वेडेपणा आणि जुन्या आठवणींचाही खास मेळ पाहायला मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे हा सिनेमा तरुणांसोबतच प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना रिलेट होईल, अशी चर्चा आहे.

फ्रेंडशिप डेच्या आठवड्यात म्हणजेच ३१ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे मित्रांसाठी हा सिनेमा एक खास सिनेमॅटिक ट्रीट ठरणार असल्याचं बोललं जात आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page