अंकिताने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत सरकारला ठोस कायदा करण्याचं आवाहन केलं. अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये कोणतीही पळवाट राहू नये आणि गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण झाली पाहिजे, असं तिने म्हटलं आहे.
व्हिडिओमध्ये बोलताना अंकिता म्हणाली की, राज्यात अशा घटना वारंवार समोर येत आहेत आणि प्रत्येक वेळी निषेध, मोर्चे आणि न्यायाची मागणी होते. मात्र कठोर शिक्षा आणि जलद न्याय मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे. समाजात बदल घडवण्यासाठी केवळ चर्चा नव्हे, तर ठोस कृतीची गरज असल्याचं तिने नमूद केलं.
तिने सरकार आणि विरोधकांना एकत्र येऊन अशा गुन्ह्यांविरोधात ठोस कायदा तयार करण्याची मागणी केली. महिलांच्या सुरक्षेसाठी कडक नियम आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी झाली, तर भविष्यात अशा घटनांना आळा बसू शकतो, असंही ती म्हणाली.
अंकिताने तिच्या पोस्टमध्येही स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. समाज म्हणून आपणही जबाबदार आहोत. चुकीच्या गोष्टी दिसूनही गप्प राहणं योग्य नाही. मुलींची सुरक्षा हा त्यांचा हक्क आहे आणि त्यासाठी समाजासोबतच प्रशासनानेही अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज आहे, असं तिने म्हटलं.
या पोस्टनंतर अनेकांनी अंकिताच्या भूमिकेला पाठिंबा दिला असून, सोशल मीडियावरही कठोर कारवाईची मागणी अधिक जोर धरताना दिसत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
